सोलापूर – भाजपा स्थापना दिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षीप्रमाणे काल चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या वतीने भवानी पेठ येथे ‘पाणपोई’ सुरू करण्यात आली. स्व. अनिल दासरी यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या या पाणपोईचे उद्घाटन त्या भागातील प्रसिद्ध डॅा. आनंद आलुरे व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नरसप्पा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना डॅा. आलुरे यांनी चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या सामाजिक कार्यात सातत्य आहे. वर्षभरात सतत त्यांचे विविध समाजपयोगी कार्यक्रम चालूच असतात आणि ते अखंडपणे चालू असतात हे विशेष . दरवर्षी न चुकता दिपावली फराळ वाटप, डोळे तपासणी, मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्यशिबिरे, गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप यांसह असे अनेक कार्यक्रमांची नुसती रेलचेल असते.
गेल्या अनेक वर्षापासून पाणपोई सुरू आहेच आणि यावेळी याचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ कार्यकर्ते नरसप्पा पुजारी यांनीही चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी मित्र परिवाराचे गुरूनाथ कोळी, कल्याण करजगी, श्रीनिवास दासरी, पप्पू क्षीरसागर,किरण वल्लाल, सद्दाम कोसगीकर, नितीन हलसगी, करण हलसगी, श्रीनाथ संदुपटला, अभिषेक वल्याळ, प्रथमेश ताटी, सोमनाथ कलशेट्टी, ओम जमादार साईनाथ सज्जे आदी उपस्थित होते.


















