सोलापूर : ए जी पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा भरारी-2026 नुकताच पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध वैज्ञानिक प्रा. व्यंकटेश गंभीर म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग येणाऱ्या काळासाठी लागणारे तंत्र कौशल्य विकास साठी करावा आणि नवे कौशल्य सतत शिकत रहावे.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध वैज्ञानिक प्रा व्यंकटेश गंभीर व संस्थेचे सचिव श्री शिवानंद सिद्धेश्वर पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी 2025-26 या शैक्षणिक वर्षांमधील शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध खेळांच्या स्पर्धेमध्ये बक्षीसे मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रा. व्यंकटेश गंभीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील प्रत्येक विभागातील उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट विभाग व कर्मचारी / शिक्षक हे पुरस्कार देण्यात आले.
पुरस्कारांचे मानकरी पुढील प्रमाणे :
उत्कृष्ट विद्यार्थी (विभाग वार) :
1. पियुष मंडोळीकर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग
2. सृष्टी धाबे सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग
3. सलमान शेख इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग
4. सत्येन्द्र कुमार ठाकूर मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग
5. सई ब्याळे इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिकशन इंजिनिअरिंग विभाग
उत्कृष्ट कर्मचारी :
शिक्षकांमधून : प्राध्यापक राकेश मोटगी विभाग प्रमुख मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून : रुपेश कोकरे चतुर्थश्रेणी कर्मचारी
तर महाविद्यालयातील उत्कृष्ट विभाग पुरस्कार सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाला मिळाला. त्यावेळी विभाग प्रमुख प्राध्यापक एन बी पवार आणि विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच हिवाळी परीक्षेत विविध विषयात 70 पैकी 70 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व कॉलेजचे प्राचार्य डॉ एम ए चौगुले, ए जी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही व्ही पोतदार, उपप्राचार्य प्रा एस के मोहिते व कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. राकेश मोटगी तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सौ एल एस बिराजदार व बक्षीस वाचन प्रा एन बी पवार, प्रा सौ एस एन गवंडी व प्रा सौ मरेड्डी यांनी केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी प्रा राकेश मोटगी यांनी आभार प्रदर्शन केले.

























