वेळापूर – अर्धनारी नटेश्वर यात्रा वेळापूर कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य श्वान शर्यत वेळापूर येथील पालखी मैदानावर उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.
माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते श्वान स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रिपाई आठवले माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, धानोरे गावचे माजी सरपंच जीवन जानकर, वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासो मुंगूसकर, धानोरेचे माजी सरपंच नामदेव देवकते, गटनेते संजयआबा मंडले, दीपकआबा राऊत, अमृतराव माने देशमुख, हनुमंत वायदंडे, माजी उपसरपंच जावेद मुलाणी, तसेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष काशिनाथ आडत, उपाध्यक्ष अॅड. विठ्ठल मंडले, उपाध्यक्ष रणजीत साठे, कार्याध्यक्ष अमोल मंडलिक, खजिनदार दादा तुपे, सरचिटणीस विनायक भगत, सचिव अभिजीत साठे, सेक्रेटरी विजय पवार, सदस्य मनोहर माने तसेच संजय देशपांडे, माजी ग्रामपंचायत सदस्य अमृतकाका माने देशमुख, शंकर आडत, शिवाजी सावंत, लखन मंडले, अजीत साठे, शिवाजी मंडले, वौभव बनसोडे, धनंजय शिवपूजे आदी मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा शाहीद मुलाणी व दोस्ती ग्रुप निमगाव यांच्या देखरेखीखाली यशस्वीरीत्या पार पडली.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले —
प्रथम क्रमांक: मनोज बुधावले (अंबिका रेसिंग क्लब, कलढोन मायनी) यांची ‘बेला क्वीन’
द्वितीय क्रमांक: गोल्डन ग्रुप, महाराष्ट्र यांचा ‘डेंजर’
तृतीय क्रमांक: लाडू रेसिंग क्लब, शेवते शिराळा यांची ‘लाल रॉकेट’
याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या एक ते वीस क्रमांकाच्या सर्व श्वानांना बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. एकूणच या श्वान शर्यतीने यात्रेच्या उत्साहात भर घालत कार्यक्रम रंगतदार ठरला.
























