सोलापूर : अखिल भारतीय सफाई मजदूर युनियन, सोलापूर शहर व जिल्हा शाखेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुनम गेट, जिल्हा परिषद चौक येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंह टाक यांच्या आदेशानुसार राज्यभर हे आंदोलन राबविण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात झाली. कामगारांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडत मागण्यांकडे लक्ष वेधले.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाली मंडेपु, संघटक अशोक इंदापूरे, अध्यक्ष शंतुनू गायकवाड, शशीकांत सिरसट, दशरथ अडाकुल, अरुण स्वाके, श्रीनिवास रामगल, व्यंकटेश देवनलू, श्रीनिवास मंदोलू, तिरुपती बोनसे, अशिष धुंबड, अमित सौदे, शाहरुख शेख, कन्हैया लालबेगी, सुभाष स्वाके, बाळु केशपागा, तुकाराम पेदोलू, नारायण अडाकुल, नर्सय्या चीनाकारम, नागेद्रम बेरकोलू, पांडुरंग रातोलू, सिद्राम भंडारी, कुर्मय्या मंदोलू, नागराज रातोलू, देविदास कोमोलू, कुमार सांगे, अमजद शेख, श्याम चव्हाण, महेश परमार, राजू कावल, कृष्णा केशपागा यांच्यासह अनेक कामगार सहभागी झाले.
खाजगीकरण बंद करा, ठेकेदार कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपीकरण, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग बंद, वेतन आयोग लागू करणे, जुनी पेन्शन योजना, घरकुल व मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत यांचा समावेश आहे. आंदोलनानंतर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

























