वेळापूर – माळशिरस तालुका पंचायत समिती आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण स्मृती भवन अकलूज येथे संपन्न झाले. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूर मुली या शाळेतील उच्च विद्या विभूषित असलेल्या उपक्रम शिक्षिका श्रीम. किरण घाडगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर, पंचायत समिती सभापती दत्ता भैया मगर, गटशिक्षणाधिकारी सौ.महामुनी मॅडम तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
वेळापूर मुली शाळेचे नाव एक उपक्रमशील आणि प्रयोगशील शाळा म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये घेतले जाते. तालुक्यातील पहिली सायकल बँक योजना सुरू करणारी शाळा म्हणून या शाळेचा उल्लेख केला जातो. लंगडी तसेच लोकनृत्य प्रकारामध्ये ही शाळा तालुक्यात प्रथम क्रमांकाने विजेती आहे. या शाळेमध्ये मुलींना कराटे प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर डिजिटल शिक्षण मुलींना दिले जाते. डी वाय एस पी पासून आरोग्य अधिकारी पर्यंत व्यक्तींचे मार्गदर्शन मुलींना घडवून आणले जाते.
महिला मेळावे, बालिका मेळावे, विविध जयंती, पुण्यतिथी, सण,उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. श्रीम. किरण घाडगे या उच्च विद्याविभूषित असून त्यांनी सेट, नेट, पेट सारख्या स्पर्धा परीक्षा तसेच शिक्षण क्षेत्रात सर्वोच्च समजली जाणारी पीएच.डी पदवी संपादन केली आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील सर्व शिक्षक, वेळापूर ग्रामपंचायत सदस्य डॉ. स्नेहलताई जानकर , गटशिक्षणाधिकारी महामुनी मॅडम,विस्ताराधिकारी असलम इनामदार, केंद्रप्रमुख बापूसाहेब नाईकनवरे मुख्याध्यापक तांबोळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच ग्रामस्थ यांनी त्यांच्या अभिनंदन केले.

















