बार्शी – तालुक्यातील गुळपोळी गावची कन्या कु. विद्या दत्तात्रय काळे हिची सोलापूर शहरातील महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तिचा महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने पुष्पहार, शाल आणि महापुरुषांचे पुस्तक देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
हा सत्कार संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी आणि दिपाली चौधरी यांच्या हस्ते पार पडला. केवळ विद्याचाच नव्हे, तर आपल्या पाल्याला या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी झटणाऱ्या तिच्या आई-वडिलांचाही यावेळी पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला गुळपोळी गावचे पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे, युवा उद्योजक किरण खुरंगळे, श्रेयश काळे, दत्तात्रय काळे, वंदना काळे, सुभद्रा चौधरी, रंजना खुरंगळे, दिपाली चौधरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सामान्य कुटुंबातील मुला-मुलींनी जर ध्येय निश्चित केले आणि त्यासाठी प्रामाणिक मेहनत घेतली, तर यश नक्कीच मिळते, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.


















