
सोलापूर – शहरामध्ये स्मार्ट मीटर जबरदस्तीने सोलापूर शहरवासीयांना लादण्याचे व सक्तीने बसवण्याचे जे प्रकार चालू आहे ते तात्काळ थांबविण्यात यावे स्मार्ट मीटरचे युनिट हे जनतेला परवडणारे नसून या युनिट ची माहिती ग्राहकाला न मिळता डायरेक्ट वरून बिल आकारण्यात येत आहे व वरून बीज कनेक्शन खंडित करण्यात येत आहे सोलापूर शहरांमध्ये सर्वत्र या निर्णयाविरोधात ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महावितरणचे अधिक्षक अभियंता सुनील माने यांना स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुर्णपणे विरोध करत स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सक्ती कराल तर मनसे स्टाईलने चोप दिला जाईल असा इशारा शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख यांनी दिला आहे.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, संतोष कुमार घोडके, अमर कुलकर्णी, प्रकाश कोळी, अभिषेक रंपुरे, सुभाष माने, निलेश भंडारे, जितेंद्र टेंभुर्णीकर आदी उपस्थिती होते .





















