सोलापूर दि.5 एप्रिल 2026 रोजी श्रीराम सेना व प्राणीन फाउंडेशन सोलापूर च्या गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सोलापूर वरून कर्नाटक च्या दिशेने बेकायदेशीरित्या शेती उपयुक्त देशी गोवंशांची तस्करी होणार आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार गोरक्षकांनी रात्री सापळा रचला असता. पहाटे चार वाजताच्या दरम्यान एक अशोक लेलँड कंपनीचे पॅक बॉडी दहा चाकी कंटेनर संशयितरित्या वाहतूक करीत असतानाचे गोरक्षकांच्या निदर्शनास आले. वाहन क्र. KA. 01.AL.3546 हे दहा चाकी कंटेनर कर्नाटकच्या दिशेने संशयितरित्या जात आहे. असे लक्षात येताच गोरक्षकांनी सदर वाहन केगाव येथील पुलावरून जात असताना समर्थ चायनीज सेंटर या दुकानासमोर कंटेनर चालकास सांगून सदर वाहन रस्त्याच्या कडेला थांबविले असता.
सदर वाहन थांबताच वाहनातील ड्रायव्हर, क्लिनर व इतर दोन इसमांनी पळ काढण्यास सुरुवात केली असता. गोरक्षकांनी तत्काळ समय सूचकता, कार्यतत्परता, कर्तव्यदक्षता दाखवीत चौघांना ताब्यात घेऊन. सदरील वाहन चालकाची चौकशी केली असता वाहन चालकांने असे सांगितले की, कंटेनर मध्ये 30 बैल आहेत व ते विजापूर येथे कत्तलीसाठी घेऊन जात आहे.असे ऐकता क्षणी आम्ही घटनास्थळावर उपस्थित असलेल्या गोरक्षकांनी क्षणाचाही विलंब न लावता त्वरित सोलापूर सिटी कंट्रोल तसेच महाराष्ट्र स्टेट कंट्रोल डायल नंबर 112 वर संपर्क साधून सदर घटनेची सविस्तर माहिती दिली. काही वेळातच घटनास्थळावर फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दाखल झाले व त्यांनी सदर वाहनाची पाहणी केली असता पॅक बॉडी असलेल्या दहा चाकी कंटेनर मध्ये सर्व शेती उपयुक्त देशी खिलार जातीच्या बैलांचे तोंड हे वाहनाच्या वरील बाजूस असलेल्या लोखंडी अँगल ला बांधण्यात आले होते.
कंटेनर मधील बैलांच्या पोटाला देखील दोरखंडाने लोखंडी अँगल ला करकचून बांधलेले होते. जेणेकरून जास्त हालचाल करता येऊ नये म्हणून. कंटेनर मधील बैलांना अधिक दाटीवाटीने, कुठल्याही प्रकारची हालचाल न करता येण्यासारखे,अतिशय क्रूरतेने,निर्दयतेने,अमानवीयतेने वेदना देत कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत आहे असे निष्पन्न झाले. सदर आरोपींची विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे
1) आरिफ मर्दनसाब तहसीलदार
2) रघु शिवन्ना जाधव
3) मुबारक नन्नूसाब बेपारी
4) मलिक रिहान बादशाहसाब (वाहन चालक) त्यानंतर सदर कंटेनर फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे रीतसर जमा करून कंटेनर मधील सर्व 30 खिलार जातीचे बैल हे पुढील चारा पाण्याच्या देखभालीसाठी अहिंसा गोशाळा येथे सुखरूपरीत्या जमा करण्यात आले.
सदर कार्यवाहीतील आरोपींवर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही यशस्वी करण्याकरिता श्रीराम सेने चे जिल्हाध्यक्ष शितल परदेशी, श्रीराम सेना जिल्हा गोरक्षा प्रमुख पवन कुमार कोमटी , प्राणिन फाउंडेशनचे वरिष्ठ अनिकेत गोरट्याल, गोरक्षक प्रशांत परदेशी, सौरभ कुलकर्णी, राजन सिरसिल्ला,वीरू मंचाल,अमोल चौगुले तसेच इतर गोरक्षकांनी अथक परिश्रम घेतले.






















