मोडनिंब – येथे टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परि. सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांनी पोलीस ठाणे हद्दीत येणार आगामी सण, उत्सव, महापुरुषांचे जयंती चे काळात कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची पूर्व तयारी करणे करता रविवारी रोजी दुपारी दरम्यान मोडनिंब शहरातील मुख्य रस्त्यावरून व मध्यवर्ती भागातून पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड यांच्यासह सरकारी वाहने सह रूट मार्च आयोजित केला होता.त्यानंतर दंगा काबू योजनेची पूर्वतयारी म्हणून पोलीस ठाण्याचे आवारात लाटी ,हेल्मेट ढाल गॅस गन रायफल इत्यादी सह पोलीस अधिकारी व अंमलदार यांची रंगीत तालीम घेण्यात आली.त्यानंतर शहरातून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, होमगार्ड यांच्यासह मेन रोडने व मध्यवर्ती भागातून रूट मार्च घेण्यात आला आहे.टेंभुर्णी पोलीस ठाणे कडून घेण्यात आलेल्या रूट मार्च व दंगा काबू रंगीत तालीम याद्वारे पोलीस ठाणे हद्दीतील जनतेस कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही असे रूट मार्च द्वारे सूचित करण्यात आले आहे.
सदर रूट मार्च करता व दंगा काबू योजने करता राहुल आत्राम, (IPS), परी सहाय्यक पोलीस अधीक्षक ,प्रभारी अधिकारी टेंभुर्णी पोलीस ठाणे, प्रशांत मदने, पोलीस उपनिरीक्षक टेंभुर्णी व पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार, माढा पथकाचे होमगार्ड उपस्थितहोते.
























