Thursday, July 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्याची तिजोरी सर्वसामान्यांच्या मालकीची, त्यामुळे पैशावर अधिकार कुणीही सांगू नये

तरुण भारतbyतरुण भारत
April 13, 2026
in editor
0
राज्याची तिजोरी सर्वसामान्यांच्या मालकीची, त्यामुळे पैशावर अधिकार कुणीही सांगू नये
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – राज्याची तिजोरी ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी असते. त्याच्यावर राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य जनतेचा अधिकारी असतो. त्यामुळे पैशावर अधिकार कुणीही सांगू नये. हे पैसे जनतेचे आहेत याची जाणिव प्रत्येकाने ठेवली पाहिजे असे खडे बोल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता राज्यातील भाजपाचे मंत्री,आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना सुनावले. कारण शिवसेना कार्यकर्त्यांकडून वारंवार निधी बाबत सत्तेतील मित्रपक्ष भाजपाकडून आपणावर दुजाभाव केला जात असल्याच्या तक्रारींचा पाढा वाचला जात होता. त्यावर भाष्य करताना शिंदे यांनी परखड शब्दात मित्रपक्ष भाजपाला ( नाव न घेता ) एक प्रकारे सज्जड इशाराच दिला.  


येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके आणि भैरवनाथ शुगर्सचे अनिल सावंत यांनी शिवसेना ( एकनाथ शिंदे ) पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे दुप्पटे भालके, सावंत तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या गळ्यात घालून शिवसेनेत त्यांचा प्रवेश झाल्याचे जाहीर केले. यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या तिजोरीवर सर्वात पहिला अधिकार कुणाचा तो राज्यातील बळीराजाचा,लाडक्या बहिणीचा,लाडक्या भावांचा आहे. आम्ही जनतेचे मालक नाहीत तर सेवक आहोत. आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. पण आपल्यामुळे सर्वसामान्य जनतेला सोन्याचे दिवस कसे येतील या विचाराने आपण नेहमी काम करीत असतो.
आपण किती प्राँपर्टी कमाविली या पेक्षा आपल्याकडे सर्वसामान्य जनतेची किंवा लोकांची श्रीमंती किती आहे या गोष्टीला आपण महत्व देत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण मुख्यमंत्री असताना ऐवढा निधी दिलेला आहे की त्या दिलेल्या निधीतून अजून देखील काही ठिकाणी कामांचा शुभारंभ किंवा पुर्ण झालेल्या कामांची उदघाटने केली जात आहेत. आपण कधी या हाताचे या हाताला कळु दिले नसल्याचे आवर्जुन त्यांनी सांगितले.


शिंदेची शिवसेना ठाण्यापुरतीच मर्यादित राहणार असे विरोधकांकडून बोलले जायचे. त्यामुळे शिवसेना खरी कोणती हे वेगळे सांगण्याची आता गरज नसल्याचे यावेळी शिवेसना पक्ष प्रमुख शिंदे सांगितले. कारण प्रत्येक निवडणूकीत राज्यातील जनतेने दिलेल्या भरभरुन मतदाना मुळे शिवेसना चांद्यापासून ते बांद्यापर्यंत विस्तारलेली आहे. यापुढे देखील तिचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत राहिल. भगिरथ भालके, अनिल सावंत या सारखी तरुण मंडळी आता शिवसेनेत येत आहेत. त्यामुळे या मंडळींनी शिवसेना वाढीसाठी मनापासून प्रयत्न करावेत. आपण आज ही स्वत:ला शिवसेनेचा कार्यकर्ताच समजतो आहे. भालके, सावंत यांनी आता शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे आपणा सर्वांच्या पाठिमागे विठ्ठल आहेच पण भालकें, सावंत यांच्या पाठीमागे या पुढील काळात एकनाथ देखील भक्कमपणे उभा आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
———————

काँरिडोरला शिंदेची देखील मान्यता
यावेळी भाषणात पंढरपूर काँरिडोर बद्दल बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँरिडोरचे काम हे सर्वांना विश्वासात घेऊनच केले जाईल असे नेहमीच्या पठडतील उत्तर दिले. मात्र राज्यभरातून, देशभरातून, आणि जगभरातून येथे लाखों भक्त येतात. त्यामुळे पंढरपूर हे तिर्थक्षेत्र आपणाला जागतिक दर्जाचे तिर्थक्षेत्र करावयाचे आहे. आता तर भगिरथ देखील आपल्या बरोबर आहेत त्यामुळे सर्वांनी मिळून या पंढरपूरचा कायापालट करावयाचे असल्याचे सांगत एक प्रकारे उपमुख्यमंत्री शिंदे यांची देखील पंढरपूर काँरिडोरला मान्यता असल्याचे त्यांच्या बोलण्याच्या रोखातून दिसुन आले.
——————–

शंभर कोटींची निधीची घोषणा काही झालीच नाही
भगिरथ भालके यांनी पक्ष प्रवेशा संदर्भात माहिती घेताना घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी ज्या दिवशी पक्ष प्रवेश होईल त्याच दिवशी नेत्याकडून पंढरपूरच्या विकासकामांसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करुन घेऊ असे सांगितले होते. मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केवळ पंढरपूर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी निधी आणि मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर आणि चोखामेळा स्मारकासाठी निधी बद्दलच मोगम उहापोह केला. त्यामुळे शंभर कोटी निधी आणू म्हणणारे भालके आता यापुढील काळात किती निधी आणतात हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
——————-

आँपरेशन बिपरेशनच्या फंदात आपण पडत नाही
येथे काही पत्रकारांनी आपणाला विचारले की, आँपरेशन टायगरची सुरुवात झाली आहे का ? आपण एकदाच आँपरेशन केलेले होते. ते अजून देखील सर्वांच्या लक्षात आहे. आज पर्यंत आपल्या शिवसेनेत कित्येक जण सहभागी झालेले आहेत. त्यामुळे जर ओषध, गोळ्याने उपचार होत असेल तर आँपरेशन बिपरेशनच्या फंदात आपण पडत नसल्याचे देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
————-

भालकेंनी केल्या या मागण्यां
यावेळी नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके यांनी पंढरपूर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी, यमाई तलाव विकासासाठी, शहरातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली. तर भगिरथ भालके यांनी आषाढी यात्रेच्या कामांसाठीचा निधी अगोदरच मिळावा, मंगळवेढा येथे २४ गावांच्या उपसासिंचन योजनेसाठी, चोखामेळा,महात्मा बसवेश्वर आदी कामांसाठी निधीची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी केली.
——————

यांची होती उपस्थिती
या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यास आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री भरत गोगावले, खासदार ज्योती वाघमारे, माजी मंत्री तानाजी सावंत, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, जिल्हा प्रमुख महेश साठे आदी प्रमुख मंडळींसह शिवसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post Views: 46
Previous Post

विठ्ठल रुक्मिणी पादुका विसावा मंदिराचा जिर्णोद्धार हे आमच्या संस्कृतीचे जतन

Next Post

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये जागतिक आरोग्य दिन उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये जागतिक आरोग्य दिन उत्साहात

सिंहगड पब्लिक स्कूलमध्ये जागतिक आरोग्य दिन उत्साहात

ताज्या बातम्या

खुशखबर …… जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा

July 22, 2026

एसबी प्लाझा आयकॉन या इमारतीतील अतिसाराचा एक रुग्ण अत्यवस्थ

July 22, 2026
बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

बार्शीत भीषण हिट अँड रन; शिक्षक वडील व ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

July 22, 2026

बार्शी तालुक्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लग्न; तरुणावर पोक्सोसह गंभीर गुन्हा दाखल

July 22, 2026

भव्य शालेय दिंडी व विठ्ठल रुख्मिणी वेशभूषा स्पर्धा २०२६ #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

त्या महिलेने चिठ्ठीत दिली मठ उडवण्याची धमकी #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0992837

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!