सांगोला – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवात लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी सामील होऊन उत्साहाने साजरी करा. परंतु मिरवणुकीत नो डीजे, नो डॉल्बी, पारंपारिक वाद्याच्या माध्यमातून जयंती उत्सव साजरा करा असे आवाहन सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले. ते नाझरे (ता.सांगोला) ग्रामपंचायत मध्ये आयोजित जयंती निमित्त बैठकीत बोलत होते.
या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक पोपट काशीद, पोह.सुजित जाधव, भानवसे, सुनील कांबळे, डॉ.विजय सरगर, मधुकर ढोबळे, सुरेंद्र ढोबळे, संदिपान पवार, अमोल काळोखे, शुभम ढोबळे, महादेव ढोबळे, गणेश ढोबळे, अनिकेत पवार, प्रवीण ढोबळे, विनोद पवार, सुभाष पवार, पोलीस पाटील लक्ष्मण बनसोडे, गौतम साठे, अण्णा ढोबळे, आनंदा कोकरे, सचिन कोकरे, तुकाराम वाघमोडे, दत्ता सरगर, नितीन टिंगरे उपस्थित होते.























