सांगोला – महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक विभागातून राज्य संघटनेचे पदाधिकारी निवडले जात आहेत. ही प्रक्रिया झाल्यानंतर राज्याच्या सात विभागातून निवडलेल्या केंद्रीय व्यवस्थापन समिती सदस्यांमधून राज्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस व खजिनदार निवडले जाणार आहेत. या अंतर्गत संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक सातारा येथे पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सल्लागार शिवगोंडआण्णा खोत तसेच सरचिटणीस विकास सूर्यवंशी, उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे उपस्थित होते. यावेळी सोलापूर जिल्ह्यातून अंबादास शिंदे व उत्तम चौगुले यांची राज्य कार्यकारणी सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली.
या बैठकीचे आयोजन राजेंद्र माळी, गणेश पवार, ताजुद्दीन आगा, गणेश पवार, भास्कर भोरे, लहुराज लवळे, हमीद खान यांनी केले. राजेंद्र माळी यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.























