सांगोला – समता प्रशिक्षण केंद्र, डोंगरगाव (ता.सांगोला) येथे प्रथम कम्युनिटी कौशल्य प्रशिक्षण कॅम्प अंतर्गत शिवणकला प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी सुधाकर सर, बापूसाहेब ठोकळे, ललित बाबर, शहाजी गडहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नंदा रोकडे, राजेश ठोकळे, सुरेश बाबर, शर्मिला केदार, सीमा गवळी, प्रभा यादव, भावना बाबर उपस्थित होत्या.























