पंढरपूर – महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९५ व्या जयंती निमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उघ्दाटन महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करून करण्यात आले.
या रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी भर उन्हाची तीव्रता असतानाही रक्तदान करून महात्मा बसवेश्वर महाराज यांना अभिवादन केले. रक्तदान शिबीरात सहभागी झालेल्यांना पाण्याचा जार भेट म्हणून देण्यात आला.
या कार्यक्रमास श्वेता डोंबे,सुनिता लिगाडे,दिपाली ठिगळे,आरती बसवंती, निलराज डोंबे,राजेश्वर लिगाडे,महेश विभुते,सुरज पावले,मयुर भिंगे,गंगाधर स्वामी,सागर स्वामी,प्रशांत मेनकुदळे,गिरिष पंतोजी-पाटील,ओंकार बसवंती आदींसह वीरशैव लिंगायत समाजबांधव उपस्थित होते. हे शिबीर श्री मन्मथ स्वामी मठ येथे घेण्यात आले होते.






















