सोलापूर – मंद्रूप येथील ग्रामपंचायत वार्ड क्रमांक २, इंदिरानगर येथील रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप पुरस्कृत जनक्रांती पॅनलचे उमेदवार अंकीता उमाशंकर रावत यांनी माघार घेतल्याने सुनंदा सोमनिंग मुगळे या बिनविरोध निवडून आला आहे. या विजयामुळे परिसरात राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून येणार आहे.
या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोरे गटाकडून एकही उमेदवार उभा राहीला नाही. भाजपकडून एक उमेदवार उभा करण्यात आला होता. मात्र अर्ज छाननीदरम्यान त्याचा अर्ज बाद ठरला. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात केवळ भाजप पुरस्कृत जनक्रांती पॅनलचे उमेदवार उरले.
जनक्रांती पॅनलकडून राऊत आणि मुगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र मनीष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पॅनलमध्ये समन्वय साधण्यात आला. पक्षहित, संघटनशक्ती आणि विकासाला प्राधान्य देत एका उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे सुनंदा सोमलिंग मुगळे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
या संपूर्ण प्रक्रियेत मनीष देशमुख यांचे नेतृत्व आणि निर्णयक्षमता ठळकपणे दिसून आली. त्यांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे पक्षाची संघटनशक्ती अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसले.
विजय घोषित होताच भाजप पुरस्कृत जनक्रांती पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी हनुमंत कुलकर्णी , गौरीशंकर मेंडगुडले, निलेश
हेळकर, महेश मेंडगुदले , सिद्धाराम काळे , नितीन रणखांबे, बबलू पोतदार, अनिल जोडमोठे आदि उपस्थित होते.
पॅनल प्रमुख उमामाशंकर राऊत व रेवणसिद्ध मेंडगुदले म्हणाले की, “हा विजय जनतेचा आणि नेतृत्वावरच्या विश्वासाचा आहे. मनीष देशमुख यांच्या सक्षम मार्गदर्शनामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंद्रूपच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.




















