बार्शी – महापुरुषांच्या विचारांची उपयुक्तता ही समाजाला नवविचार व नवदिशा देत असते. त्यामधून सामाजिक आत्मभान व गतिमानता येत असते. समाज परिवर्तनाचे पाऊल टाकताना समाजसुधारकांचे विचार संजीवनी ठरतात, असे प्रतिपादन डॉ. राहुल पालके यांनी केले.
यशराज बहुउद्देशीय व संशोधन संस्था बार्शी यांच्याकडून महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण सभारंभाप्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन प्रा.डॉ राहुल पालके व बसवराज पुरवंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विनोद कबाडे, शंकर वाघमारे, अमोल कुलकर्णी, ॲड. वृषाली वाघमारे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. पालके म्हणाले, महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेतून समकालीन परिस्थितीमध्ये न्याय सुसंगत भूमिका राखली जावू शकते. जात, धर्म, लिंग, पंथ, भाषा, प्रदेश यामुळे निर्माण होणारे भेदभाव बाजूला ठेवून सामाजिक एकोपा वाढीस लागणे गरजेचे आहे. प्रतिगामी प्रवृत्तीला विरोध करुन सामाजिक जाण व भान जपणे गरजेचे आहे.
या स्पर्धेतून महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा जागर झाला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाचन, मनन, चिंतन, लेखन व वाणीतून विषयाची मांडणी करत असताना बाबासाहेबांच्या व महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा यानिमित्ताने घेतला. स्पर्धेसाठी पालक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. कोमल कबाडे यांनी केले व स्पर्धेचे परीक्षण ॲड. वृषाली वाघमारे आणि प्रा.अमोल कुलकर्णी यांनी केले. या स्पर्धेसाठी शंकर
वाघमारे, यल्लाप्पा कट्टीमनी, सागर जानराव, संजय निरंजन, परमेश्वर खुने, यशराज कबाडे ,मयूर कबाडे,संतोष गुंड, रंगनाथ हांजगी, शिलाजी घोळवे, हेमंत मेश्राम, विकास ओमन, प्रमोद पाटील, प्रथमेश निरंजन, अंकुश बांगर, विलास शिंदे, प्रमोद शिंदे आदींनी सहकार्य केले.या वक्तृत्व स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध गटातील विद्यार्थी सहभागी झालेले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुस्तके देण्यात आली तर सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात आली.
या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- गट ५ वी ते ७ वी- प्रथम- रंजना माने, द्वितिय- रुही गुळवे, तृतीय- विहान उमाप. गट ८ वी ते १० वी- प्रथम- प्रणाली धस, द्वितीय- श्रवण आडसूळ, तृतीय- शितल गुळवे. खुला गट- प्रथम- प्रथम भिंगारे, द्वितीय- अपूर्व आगलावे, तृतीय- रोहन भंडारी.


















