Saturday, April 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा जपण्याचे आवाहन – कॉ. अशोक ढवळे

तरुण भारतbyतरुण भारत
April 18, 2026
in editor
0
पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा जपण्याचे आवाहन – कॉ. अशोक ढवळे
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची समृद्ध परंपरा लाभलेली असून, या परंपरेतूनच सर्वसामान्य नागरिकांना संविधानिक अधिकार प्राप्त झाले आहेत, असे प्रतिपादन कॉ. अशोक ढवळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर पिडीत, शोषित आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी संघर्ष केला, असे नाही तर त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांनाही प्राधान्य दिले असे त्यांनी अधोरेखित केले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त दत्तनगर येथील पक्ष कार्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

पुढे बोलताना कॉ. ढवळे यांनी भारतीय समाजरचनेतील वर्ण, वर्ग आणि जात व्यवस्थेवर सखोल भाष्य केले. “जात म्हणजे बंदिस्त केलेला वर्ग,” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते, याची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, जगात मूलतः दोनच वर्ग आहेत – ‘आहेरे’ (श्रीमंत) आणि ‘नाहीरे’ (गरीब). भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटूनही या दोन वर्गांमधील दरी कायम आहे, ही चिंतेची बाब आहे.

इतिहासातील सामाजिक संघर्षांची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, १९२७ साली चवदार तळे सत्याग्रह हा समतेचा निर्णायक लढा होता. त्याआधी १८६८ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या वाड्यातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करून सामाजिक समतेचा संदेश दिला. डिसेंबर १९२७ मध्ये मनुस्मृतीचे दहन करण्यात आले, तर २ मार्च १९३० रोजी नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू झाला, जो तब्बल साडेपाच वर्षे चालला.

१९३५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेच्या अधिकारासाठी धर्मांतर करणार असल्याची घोषणा केली आणि अखेर १९५६ मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.एम. एच. शेख यांनी केले, तर वक्त्यांचा परिचय कॉ .दत्ता चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन ॲड. अनिल वासम यांनी केले.

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम यांनी केला. आपल्या समारोपात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आदर्श समाजनिर्मितीसाठी मार्गदर्शक असून ते प्रत्यक्ष आचरणात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख मेजर, नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, म. हनीफ सातखेड, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, रंगप्पा मरेड्डी, प्रा. अब्राहम कुमार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे तांत्रिक संयोजन बालकृष्ण मल्याळ यांनी केले.

 

भोंदूपणाला साधुत्वाचा मुलामा – पुरोगामी महाराष्ट्रासाठी धोकादायक

महाराष्ट्र ही संत आणि समाजसुधारकांची भूमी असताना, आज काही भोंदू प्रवृत्तीच्या व्यक्तींना ‘साधू’ म्हणून गौरवले जात आहे, ही चिंताजनक बाब असल्याची टीका कॉ. ढवळे यांनी केली. अशा प्रवृत्तींमुळे पुरोगामी विचारसरणीला धक्का बसत असून, समाजाने विवेकवादी भूमिका घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Post Views: 10
Previous Post

यशराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे वक्तृत्व स्पर्धा व बक्षीस वितरण उत्साहात

Next Post

येडेश्वरी यात्रा काळात नियोजन यशस्वी; एसटी च्या उत्पन्नात ६२ लाख ६६ हजारांची वाढ.!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
येडेश्वरी यात्रा काळात नियोजन यशस्वी; एसटी च्या उत्पन्नात ६२ लाख ६६ हजारांची वाढ.!

येडेश्वरी यात्रा काळात नियोजन यशस्वी; एसटी च्या उत्पन्नात ६२ लाख ६६ हजारांची वाढ.!

ताज्या बातम्या

पाया पडायला आला भसकन तरुण बंगाली दीदी घाबरून गेल्या

April 18, 2026
वाशिंबे येथील प्रगतशील शेतकरी शंकर झोळ यांचे निधन

वाशिंबे येथील प्रगतशील शेतकरी शंकर झोळ यांचे निधन

April 18, 2026
शेळके वस्ती दहिगाव शाळेचा वृक्षमित्र पुरस्काराने सन्मान 

शेळके वस्ती दहिगाव शाळेचा वृक्षमित्र पुरस्काराने सन्मान 

April 18, 2026
जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलमध्ये सीनियर केजी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम संपन्न

जयप्रकाश बिले पब्लिक स्कूलमध्ये सीनियर केजी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे कार्यक्रम संपन्न

April 18, 2026
श्री गुरु रेवणसिद्धेश्वर यात्रेनिमित्त शनिवारपासून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

श्री गुरु रेवणसिद्धेश्वर यात्रेनिमित्त शनिवारपासून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

April 18, 2026
मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर उत्सव महामंडळ विजापूर रोड अध्यक्षपदी बसवराज दिंडोरे

मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर उत्सव महामंडळ विजापूर रोड अध्यक्षपदी बसवराज दिंडोरे

April 18, 2026
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार

April 18, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेस उपक्रमशील शाळा पुरस्कार

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेस उपक्रमशील शाळा पुरस्कार

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0816306

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697