सोलापूर – सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने अक्कलकोट या ठिकाणी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 148 व्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची पालखीचं आगमन झाल्यानंतर पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालखीतील भक्तांना श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे चेअरमन महेश इंगळे,मंदार (महाराज) पुजारी ( चोळप्पा महाराजांचे वंशज) आनंद तालिकोटी ( आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष) सुहास छंचुरे ( आस्था सामाजिक संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख) वेदांत तालिकोटी, सागर यलवार, शिवशरण इचगे ( तालुका प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष), आकाश शिंदे यांच्या शुभहस्ते एकूण 1000 भक्तांना आमरस ( माझा) थंडपेय बॉटल वाटप करण्यात आले.
आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून अन्न दाना बरोबर अनेक वर्षभर सामाजिक उपक्रम राबवत असते सामाजिक बांधिलकी जोपासत समाजच आपण काही तरी देणे लागतो या उद्देशाने सामाजिक कार्य करण्यात येत असते असे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी म्हणाले.
दरम्यान यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी मिरवणूक फत्तेसिंह सिंह चौक मेन रोड समाधी रोड व तसेच सुभाष गल्ली या मार्गी काढण्यात आली.
या वाटपासाठी दानशूर व्यक्ती विजयकुमार पाटील, हर्षलभाई कोठारी, डॉ महावीर शास्त्री, योगेश कुंदुर, प्रा.शरण वांगी, सुवर्णा विभुते, अर्चना अक्कलकोटे, महेश नळे, चंद्रकांत शहा, यांचे आर्थिक विशेष सहकार्य लाभले.
या थंडपेय वाटप करण्यासाठी सिद्धू बेऊर, पिंटू कस्तुरे, योगेश कुंदुर वेदांत तमशेट्टी, शशांक हडंगे,, गणेश ठेसे, सुरज छंचुरे,उदय छंचुरे, महेश नागणसुरे , सागर यलवार प्रथमेश गावडे, या आदींचे सहकार्य लाभले


















