Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम… नेटके नियोजन

तरुण भारतbyतरुण भारत
April 18, 2026
in editor
0
श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम… नेटके नियोजन
0
SHARES
58
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – राज्यभर गाजणाऱ्या आणि देशातील एकमेव असे श्री भगवंताचे मंदिर असलेल्या बार्शी येथे श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षीही भगवंत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी भरगच्च कार्यक्रम आणि नेटके नियोजन करण्यात आले असून, या ठिकाणी कार्यक्रमासाठी राज्यभरातून कलाकार व भक्त मोठ्या संख्येने येणार आहेत. अशावेळी बार्शी तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाने सहभागी व्हावे, असे आवाहन युवा नेते रणवीर राऊत यांनी केले.

तब्बल नऊ दिवस चालणाऱ्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महोत्सवाच्या अंतिम आढावा बैठकीत भगवंत मैदान येथे ते बोलत होते. यावेळी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विजय गरड, महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, उपनगराध्य रोहित पाटील, दिपक रोंगे यांच्यासह नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, विविध पदाधिकारी तसेच बार्शी शहर व ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महोत्सवासाठी दहा दिवसांत लाखो लोक येणार असल्याने आणि यावर्षी भव्यदिव्य आयोजन करण्यात आल्याने पोलीस प्रशासन व महोत्सव समितीच्या सहकार्याने ३०० पुरुष स्वयंसेवक आणि १०० महिला स्वयंसेवक मंदिर व भगवंत मैदान येथे दहा दिवस मदतीसाठी कार्यरत असतील. प्रत्येक स्वयंसेवकास ओळखपत्र देण्यात येणार असून, गर्दी नियोजनात त्यांचा मोठा हातभार लागणार आहे. हे स्वयंसेवक पार्किंग, भगवंत मंदिर, भगवंत मैदान आणि स्टेज परिसरात लोकांना सहकार्य करतील, अशी माहिती रणवीर राऊत यांनी दिली.

भगवंत महोत्सवानिमित्त २० व २१ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे राज्यस्तरीय भारुड स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत मुंबई, नागपूर, अमरावती, संभाजीनगर आदी ठिकाणांहून ४५ संघांनी सहभाग नोंदवला आहे. यातील निवडक भारुडे २० एप्रिल रोजी सायंकाळी ६ नंतर भगवंत मैदान येथे सादर केली जाणार आहेत.

तसेच २१ एप्रिल रोजी ‘होम मिनिस्टर’ हा खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या माध्यमातून गृहिणींना त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. यामध्ये हजारो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. २२ एप्रिल रोजी ‘Folk आख्यान’ हा लोकप्रिय कार्यक्रम होणार असून, यासाठी विशेष साउंड आणि लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.

२३ एप्रिल रोजी प्रसिद्ध मराठी नाटक ‘ऑल दि बेस्ट’चे सादरीकरण होणार आहे. २४ एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. २५ एप्रिल रोजी सुदेश भोसले आणि बेला सुलाखे यांचा ‘सुरीला सिलसिला’ हा कार्यक्रम होईल. २६ एप्रिल रोजी निवडक स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, श्री शिवाजी महाविद्यालयातील युवा महोत्सवातील कार्यक्रम हे त्याचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

२७ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवायन’ हे भव्य महानाट्य सादर होणार आहे. दोन मजली स्टेज, आकर्षक देखावा, घोडे, बैलगाडी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे.

२८ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजल्यापासून मंदिरात हभप डॉ. जयवंत बोधले महाराज यांचे कीर्तन होईल. त्यानंतर बार्शी शहरातून दिंडी काढण्यात येईल. दुपारी मॉर्निंग क्लबच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तर रात्री शिवशक्ती बँकेच्या सहकार्याने आतषबाजी कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.

Post Views: 129
Previous Post

पोलीस भरतीत यश मिळवलेल्या विद्यार्थिनीचा शाळेत सन्मान; न्यू हायस्कूलचा उपक्रम

Next Post

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 148 व्या पुण्यतिथीनिमित्त 1000  स्वामी भक्तांना आमरस वाटप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 148 व्या पुण्यतिथीनिमित्त 1000  स्वामी भक्तांना आमरस वाटप

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 148 व्या पुण्यतिथीनिमित्त 1000  स्वामी भक्तांना आमरस वाटप

ताज्या बातम्या

रोबोटने केले पवारांचे स्वागत…. #viral #news #marathinews

September 23, 2026

दुःख सांगत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात फोडला हंबरडा #viral #news #marathinews

September 23, 2026
सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

September 23, 2026
महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

September 23, 2026
बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी थोबडे

बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी थोबडे

September 23, 2026
स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मधील (U-14) मुली रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये यश

स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मधील (U-14) मुली रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये यश

September 23, 2026
तायक्वांदो स्पर्धेत एमआयटीच्या सूर्यतेज पाटीलची जिल्हास्तरावर निवड

तायक्वांदो स्पर्धेत एमआयटीच्या सूर्यतेज पाटीलची जिल्हास्तरावर निवड

September 23, 2026
सामंजस्यामध्ये समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविण्याची शक्ती : ॲड. मिलिंद थोबडे 

सामंजस्यामध्ये समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविण्याची शक्ती : ॲड. मिलिंद थोबडे 

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1249683

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!