कुर्डूवाडी – पहाटे उठून शहरात सर्वत्र फिरून काम करत असून सध्या शंभर दिवसात नागरीकांच्या मुलभूत गरजावर यशस्वीपणे लक्ष देवून जनतेची कामे करत आहे.दहा दिवसाआड येणारे येणारे पिण्याचे पाणी एकदिवसाआड पाणी मिळत आहे.माझ्यावर आरोप करणा—या गटनेते व तत्कालीन नगराध्यक्षांनी त्यांच्या काळातील सुमारे तीनशे कोटी रूपयांची कामे ठेकेदारांशी हाथमिळवणी करून रस्ते, गटारी,अनेक व्यापारी गाळ्यांची निकृष्ठ कामे करून शहरवाशींना धूळ चारली आहे. मुस्लिम बांधवांच्यासाठी आ.नारायण पाटील यांनी दहा लाख मंजूर केले ते काम का केले नाही. त्यामुळे त्यांनी मंजूरीसाठी दिलेल्या कामांची पुर्ण शहानीशा केल्याशीवाय पटलावर घेणार नसल्याचे स्पष्ठ करून शहराच्या विकासाठी मी कटीबध्द असल्याचे गटनेते समिर मुलाणी यांनी केवेल्या आरोपावर उत्तर देताना स्पष्ट केले. नगराध्यक्ष दालनात आज नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी पत्रकार परिषद घेवून सडेतोड उत्तर दीले. यावेळी नगरसेविका अंजली गावडे, अबोली चौधरी,सरस्वती क्षीरसागर व रेष्मा गोरे उपस्थीत होत्या.
@ शंभर दीवसामध्ये नगराध्यक्षा जयश्री भिसे या कर्तूत्वशुन्य ठरल्याचे उघड झाल्याने या काळात त्यांनी एकही काम जनतेच्या हीताचे केले नाही असा घणाघाती आरोप बुधवारी उपनगराध्य सविता जगताप यांच्या दालनात माजी नगराध्यक्ष व राष्टृवादीचे गटनेते समिर मुलाणी यांनी पत्रकार परिषद घेवून केले होते. त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून आज नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी पत्रकार परिषद घेतली.
@ जयश्री भिसे यांनी तत्कालीन नगराध्यक्ष राहीलेल्या समिर मुलाणी यांच्या काळातील अनेक कामांचा उहापोह पत्रकार परिषदेत केला.यावेळी त्यांनी शहरातील व्यावसाय वाडवण्यासाठी, उद्योग उभारण्यासाठी शहरात एम.आय.डी.सी.मंजूर आहे त्यासाठी उद्योग वाढीसाठी नगराध्यक्ष समिर मुलाणी यांनी एकतरी पत्र दीले आहे का ते अगोदर पहा असे सांगीतले..त्यांच्या काळात एकवीस गाऴे आधीच रिकामे असतांना साडेतीन कोटी घालवून बावन्न गाळे कशासाठी बांधले. अन बांधले तर त्या शाँपिग सेटरला झाकीर हुसेन किंवा ए.पी.जे अब्दूल कलाम यांचे का नाव दीले नाही. मी जे शंभर दिवसात कामे केली ते त्यांनी पंधराशे दीवसात केले नाहीत.त्यांच्या आरोपानुसार मी विषय घेत नाही तर ते विषय मी शहानीशा केल्याशिवाय घेणार नाही. कारण त्यांच्या काळात वाघमारे घर ते दाळवाले, दाळवाले घर ते वाघमारे घर असे डबल -डबल घेतल्याचे जाणवले आहे.त्यामुळे त्यांच्या सर्व कामांचे शहानीशा करून सभेत विषय घेणार आहे.तत्कालीन नगराध्यक्षांनी कुर्डू हद्दीत बेंद ओढ्याच्या पुढे रस्ता त्यांच्या शेतात जाण्यासाठी केला आहे का? असा प्रश्न केला आहे.
स्टृक्चरल आँडीट झाले नगराध्यक्षांना बोलण्याचा काय अधिकार— समिर मुलाणी.
100 दीवसात वीस पैकी एकाही नगरसेवकांच्या वार्डातील एकही काम घेतले नाही.लोकवस्ती नसलेल्या वस्तीवरील रस्ते व गटारीसाठी दोन ते सहा कोटीपर्यंत निधी चिरंजीवासाठी आणला आहे का? चिरंजीवाच्या माध्यमातुन मलीदा खाण्याचा प्रयत्न आहे का? माझ्या काळात साडेतीनशे कोटी नव्हे पावणेतीनशे कोटीचा निधी आला आहे.झालेल्या कामाचे स्टृक्चरल आँडीट होवून काम उत्कृष्टच झाल्याचे सिध्द झाले आहे.त्यावर नगराध्यक्षांना बोलण्याचा अधिकारच नाही.डी.पी.आर.मध्ये मंजूर रस्त्यामध्ये कुर्डूहद्दीतील बेंदओढ्यापुढचा रस्ता येतो.त्यामुळे सर्वसमत्तीने तो रस्ता केला आहे.असे राष्टृवादीचे गटनेते समिर मुलाणी यांनी सांगीतले.

























