
श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ संचलित बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी पूर्वत उपस्थित होत्या. योगशिक्षिका पतंजली जिल्हा संघटन समितीच्या अश्विनी नंदुरकर व त्यांचे सहकारी यांनी कृतीयुक्त मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून योगासने व प्राणायाम यांची प्रात्यक्षिके करून घेतली. ताडासन, भुजंगासन, पवन मुक्तासन, वज्रासन, शलभासन, आदि आसने व प्राणायामानंतर प्रार्थना घेऊन योग दिनाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षिकावृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहात योगसाधना केली.

















