पंढरपूर – महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघटनेने दिनांक २१ एप्रिल २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपात सोलापूर जिल्ह्यासह येथील सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर येथे गेल्या तीन दिवसां पासून कडकडीत बेमुदत संप करण्यात आला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग वपाटबंधारे कर्मचारी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक व कामगार नेते अशोक इंदापूरेयांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर येथे कर्मचाऱ्यांच्या विविधमागण्यांसाठी मंगळवार (दि.२१) पासून तीन दिवस कडकडीत बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.
यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शनयोजना लागु करणे, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० करणे, शासनाने रिक्तपदे तात्काळ भरावीत इत्यादी १६ प्रमुख माण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी संपामध्ये सार्वजनिक बांधकामविभागाचे प्रथम लिपिक एस.एम.काळे, प्रविण तुपसौंदर, प्रदिप सावंत, शिवानंद दनुरे, सचिन बागल, किशोर दिघोळे, के.ऐ.गोरे, अतुल जाधव, वैभव पंडीत, सुदर्शन कांबळे, नानाभाऊ वाळके, योगेश जाधव, अमोल पवार, गणेश मोरे, विक्रांत पाटील, श्रीमतीएस.बी.वाघमोडे, उत्कर्ष देशमुख, सचिन देठे, ए.ए.हजारे, नानागौडाबिरादार, अजय पाटील, आनंदा लोखंडे, योगेश हवलदार, एस.व्ही.लवटे, बाबा लवटे, अवधुत वाघमारे, एस.व्ही. हाके,एम.एम.यादव, श्रीमतीएस.एस.शिंदे, श्रीमती जे.एस.शेख, एस.जी.बारसकर, एस.एम.साळुंखे, एस.ए.शेख आदीकर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी अभियंता अमित निमकर, उपकार्यकारीअभियंता एस.डी.शिंदे, उपविभागीय अभियंता बि.एम. मिटकरे, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी आर.आर.घोप यांनी आंदोलक कर्मचारी यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या शासनस्तरावर पोहोच करण्याचे आश्वासन दिले.

























