Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूरच्या विकासासाठी उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे; कॉरिडॉरबाबत महत्त्वपूर्ण मागणी 

तरुण भारतbyतरुण भारत
April 24, 2026
in editor
0
पंढरपूरच्या विकासासाठी उपनगराध्यक्षांसह नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे; कॉरिडॉरबाबत महत्त्वपूर्ण मागणी 
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – तीर्थक्षेत्र पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला गतीदेण्यासाठी आणि नगरपालिके पुढील आर्थिक आव्हाने पेलण्यासाठी पालकमंत्री जयकुमारजीगोरे व आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.यावेळी शहराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करून विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी दिली. 

मुख्यमंत्र्यांच्या भेटी संदर्भात माहिती देताना उपनगराध्यक्ष धोत्रे यांनी सांगितले की, शहरातील नामसंकीर्तन सभागृह आणि उद्यानांचे नूतनीकरण पंढरपूर शहराच्या सौंदर्यीकरणासाठीजुन्या उद्यानांचे नूतनीकरण करून ती विकसित करण्याची गरज आहे. तसेच, भाविक आणिस्थानिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिमटप्प्यात आहे. या कामासाठी उर्वरित २२ कोटींचा निधी तातडीने वितरित करावा, जेणेकरून येत्याआषाढी वारीत या वास्तूचे लोकार्पण करता येईल, असे नियोजन शिष्टमंडळाने मांडले. या बरोबरच प्रलंबित रस्ते आणि निधीचा प्रश्न पंढरपूर शहरातीलअनेक भागांत रस्त्यांची कामे रखडलेली असून, या सर्व उर्वरित रस्त्यांचा ‘सविस्तर प्रकल्पअहवाल’ (DPR) तातडीने मंजूर करून या कामांना भरघोस निधी उपलब्ध करूनद्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. थकीत वीज बिल माफीआणि सोलर प्रकल्प नगरपालिकेचे वीज बिल मोठ्या प्रमाणावर थकीत असून, यामुळे पालिकेचीआर्थिक कोंडी झाली आहे. हे थकीत वीज बिल माफ करावे आणि भविष्यातील बिलांचा बोजाकमी करण्यासाठी शहरात विशेष अनुदानातून सोलर सिस्टीम बसवावी, असे निवेदनातनमूद केले आहे.

या शिष्टमंडळात उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, युवानेते प्रणवपरिचारक, गटनेते भागवत बडवे, सुजितकुमार सर्वगोड, पाणीपुरवठा सभापती अमोल डोके, नगरसेवक ॲड.सुनील वाळूजकर, धर्मराज घोडके, भाजपाशहराध्यक्ष रोहित पानकर, तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, गुरुदास अभ्यंकर,मालोजी शेंबडे,नवनाथ रानगट, आदींचा समावेश होता.

 ———————–

प्रशासकीय अडथळ्यांबाबत तक्रार

उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे
यांनी यावेळी विकासकामातील राजकीय अडथळ्यांकडेही लक्ष वेधले.”माजी आमदार प्रशांतराव परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखालीशहरात मोठी कामे सुरू आहेत. मात्र, नगराध्यक्षांकडून जाणीवपूर्वकविकासकामांत अडथळे निर्माण केले जात आहेत. “पंढरपूर शहरात पूर्ण झालेल्याविकासकामांची देयक बिले अदा करण्यासाठी नगराध्यक्षाकडून टक्केवारीची मागणी केलीजात असून, आर्थिक तडजोडीसाठी ठेकेदारांची जाणीवपूर्वक अडवणूक केलीजात आहे, अशी तक्रार शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली.” 

——————

कॉरिडॉर बाबत स्थानिकांच्या हिताला प्राधान्य

पंढरपूर मंदिर परिसरातील नियोजितकॉ
रिडॉर प्रकल्पाबाबत स्थानिकांमध्ये मोठी चिंता आहे. हा प्रकल्प राबवताना स्थानिकनागरिक आणि व्यापाऱ्यांना पूर्णपणे विश्वासात घ्यावे. कोणावरही अन्याय होऊ न देतालोकहिताचा विचार करूनच पावले उचलावीत, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडेस्पष्ट करण्यात आली.

——————

नगरपालिकेच्या भव्य प्रशासकीय इमारतीसाठी निधीची मागणी

पंढरपूर नगरपालिकेची सध्याची इमारत अपुरी पडत असून, कामकाजाच्यासोयीसाठी नवीन आणि अद्ययावत ‘प्रशासकीय इमारत’ उभारण्याची गरज आहे. या इमारतीसाठीमाजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांनी यापूर्वीच शासनाकडेपाठपुरावा करून निधीची मागणी केली आहे. याच मागणीचा पुनरुच्चार करत, शहराच्या वैभवातभर टाकणाऱ्या या प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक असलेला निधी तातडीने मंजूर करावा, अशी विनंतीशिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना केली.

—————–

शासन सकारात्मक पावले उचलणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून, पंढरपूरच्या विकासासाठी शासन सकारात्मक पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती देखील उपनगराध्यक्ष धोत्रे यांनी दिली.

Post Views: 30
Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर येथे कडकडीत काम बंद आंदोलन 

Next Post

शिवविवाहांचे आकर्षण मराठा व बहुजन समाजात दिवसेंदिवस वाढतेय

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिवविवाहांचे आकर्षण मराठा व बहुजन समाजात दिवसेंदिवस वाढतेय

शिवविवाहांचे आकर्षण मराठा व बहुजन समाजात दिवसेंदिवस वाढतेय

ताज्या बातम्या

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

June 17, 2026
पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

June 17, 2026
औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

June 17, 2026
बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

June 17, 2026
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

June 17, 2026

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

June 17, 2026
खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

June 17, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0915238

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697