पिलीव – महाराष्ट्र शिखर प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र भूषण पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार २०२६’ साठी माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील पत्रकार संजय ज्ञानेश्वर पाटील यांची निवड झाली आहे. त्यांच्या पत्रकारितेतील सातत्यपूर्ण, उल्लेखनीय आणि समाजभिमुख कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठानने त्यांना या मानाच्या पुरस्कारासाठी पात्र ठरवले आहे.
संजय पाटील यांनी आपल्या लेखणीतून समाजातील समस्यांना वाचा फोडण्याचे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या याच योगदानामुळे त्यांना या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. यापुर्वी संजय पाटील यांना शिव प्रतिष्ठान पुणे यांचा राजस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार तसेच डि एसपी न्युज चॅनेलचा महाराष्ट्र भुषण राज्यस्तरीय आदर्श दर्पणरत्न पुरस्कार तसेच मच्छिंद्र मामा खुर्द वाचनालयाचा आदर्श पञकार पुरस्कार अश्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे .
या पुरस्काराचा वितरण सोहळा येत्या २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत वाघेश्वर पॅलेस, वाघोली, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत संजय पाटील यांना हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
संजय पाटील यांच्या या निवडीमुळे कुसमोड गावसह संपूर्ण माळशिरस तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर मित्रपरिवार, आठवणी 95 माजी विद्यार्थी संघटना,पत्रकार बांधव आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.























