माढा : महाराष्ट्र राज्य शासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत माढा नगरपंचायतीस १ कोटी निधी मंजूर झालेला आहे. परंतु या तालुक्याच्या आमदारांनी याचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करू नये, असे नगराध्यक्षा अॅड मिनल साठे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
२३ जानेवारी २०२६ रोजी शासनाच्या माध्यमातून हिँदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबवण्याचे ठरवले. यानुसार १८ फेब्रुवारी २०२६ रोजी या योजनेंतर्गत नगरपंचायतीचा ठराव घेऊन निधीसाठी पाठपुरावा केला. या अभियानांतर्गत फक्त माढ्यासाठीच नव्हे तर शासनाच्या वतीने राज्यातील ३० महानगर पालिकांना प्रत्येकी ५ कोटी आणि ३९४ नगरपालिका व नगरपंचायतींना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाला आहे.
मात्र आमदार या कामाचे श्रेय घेत, जनतेची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्याधिकारी नेहा कंठे, सभापती रेशमा लंकेश्वर, वंदना लंकेश्वर, निर्मला थोरात, नगरसेवक नाना साठे आदी उपस्थित होते.























