सोलापूर : जनता सहकारी बँकेतर्फे हीरक महोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ११३ जणांनी रक्तदान केले. उन्हाळ्यामध्ये निर्माण झालेल्या रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बँकेतर्फे आयोजित शिबिरामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
शिवस्मारक संकुलात झालेल्या या रक्तदान शिबिराचे उद् घाटन सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक सी. ए. गिरीष बोरगावकर यांनीही रक्तदान केले.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे कोषाध्यक्ष सुहास जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. हेडगेवार रक्तपेढीने रक्तसंकलन केले. याप्रसंगी सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक पुरुषोत्तम उडता, सी. ए. गिरीष बोरगावकर, संचालिका चंद्रिका चौहान, संचालक सी. ए. आनंद करवंदे, सुरेश चिक्कळी, महादेव न्हावकर, ऍड. मल्लिनाथ शहाबादे, विष्णू मोंढे, प्रमोद भुतडा, उपसरव्यवस्थापिका अंजली कुलकर्णी, उपसरव्यवस्थापक मकरंद जोशी, सहाय्यक सरव्यवस्थापक रामदास सिद्धूल, तुळशीदास गज्जम, रमेश मामड्याल, मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सचिव मिलिंद फडके, कोषाध्यक्ष सुहास जोशी, संचालक माधव देशपांडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे सर्व शाखा व्यवस्थापक, मुख्य कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बँकेच्या उपसरव्यवस्थापिका अंजली कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी येवतकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.
























