सोलापूर – मंद्रूपचे केंद्रप्रमुख कल्लप्पा हेळवी यांच्या अभिनव संकल्पनेतून मंद्रूप केंद्रस्तर आदर्श शिक्षक,मुख्याध्यापक, उपक्रमशील शाळा पुरस्कार तसेच सेवानिवृत्त शिक्षक सन्मान सोहळा आणि टीईटी आणि सीटीईटी उत्तीर्ण शिक्षकांचा सन्मान सोहळा पार पडला.
मंद्रूप बीटचे विस्तार अधिकारी अयुब कलबुर्गे, भंडारकवठेचे केंद्रप्रमुख आमसिध्द हत्ताळी उपस्थित होते. बलभीम नारायणे , सुप्रिया महाजन, सुरेखा कोरे, वैभव पाटील, जहाँआरा तांबोळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर अंबादास खडतरे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आले.
जिल्हा परीषद नाईकनगर शाळा या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला. सर्व पुरस्कारार्थीना सन्मान चिन्ह, शाल आणि बुके देऊन सन्मान कारण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी अयुब कलबुर्गी, कांतीलाल गुमतापुरे मुख्याध्यापक व शिवानंद बिदरकोटे यांचे सेवानिवृत्तीनिमित्त सन्मान करण्यात आले.
शबाना शेख, नवाज जहागीरदार, सुनिता राठोड, रामसिंग पवार , विठ्ठल जतकर , कमल अणची व सुप्रिया महाजन या पुरस्कारप्राप्त शिक्षकांचेही विशेष सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता दिवाणजी यांनी केले. प्रास्ताविक मंद्रूप केंद्राचे केंद्रप्रमुख कल्लप्पा हेळवी यांनी केले तर राजू राठोड यांनी आभार मानले.























