सोलापूर – सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज केगाव येथील विद्यार्थ्यांची साऊथ एशियन गोल शॉट बॉल चॅम्पियनशिप 2026 साठी भारतीय संघात निवड झाली आहे. कोलंबो, श्रीलंका येथे 24 ते 28 एप्रिल या कालावधीत येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत हे सहभागी झाले आहेत.
सब-ज्युनिअर गर्ल्स गटात सिंहगड पब्लिक स्कूलच्या जानवी दिनेश बुराडे (इयत्ता 8 वी) हिची तसेच युथ गर्ल्स संघात श्रद्धा बालाजीसिंग चव्हाण (इयत्ता 10 वी) व आर्या मनीषा रविंद्र पाटणे (इयत्ता 12 वी) यांची निवड झाली आहे.
तसेच सब-ज्युनिअर बॉईज संघात आदित्य गणेश गुंड (इयत्ता 8 वी), आशिष अविनाश बनसोडे (इयत्ता 9 वी) व समर्थ रमेश मगर (इयत्ता 9 वी) यांची निवड झाली आहे. युथ बॉईज संघात अथर्व वेणुगोपाल गुर्रम (इयत्ता 10 वी) व वरुण विजयकुमार सरडा (इयत्ता 10 वी) यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





















