Sunday, April 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावीचा निकाल जाहीर; गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात

तरुण भारतbyतरुण भारत
April 26, 2026
in editor
0
वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावीचा निकाल जाहीर; गुणवंतांचा गौरव सोहळा उत्साहात
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता अकरावी (2025–26) चा वार्षिक निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या यशाचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा दि. 23 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संतोष कोटी होते. यावेळी उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, स्वयंअर्थसहाय्य विभाग प्रमुख सौ. सारिका महिंद्रकर, शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपप्राचार्य अनुप म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “गौरव समारंभ हा केवळ सन्मान नसून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणेचा स्रोत आहे.” वसतिगृहात राहून अभ्यास करणाऱ्या व विविध विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या मंथली टेस्ट, सुपर बॅच, स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अभ्यासपूरक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सातत्याने उंचावत असल्याचेही त्यांनी नमूद केले. जेईई अॅडव्हान्स परीक्षेत मिळालेल्या यशाचा उल्लेख करून सर्व विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घेण्याचे आवाहन केले.

सौ. सारिका महिंद्रकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थिनींचा उल्लेखनीय सहभाग अधोरेखित करत पालकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते कला, विज्ञान व स्वयंअर्थसहाय्य विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

✨ गुणवंत विद्यार्थ्यांची यादी :

🔹 कला शाखा

प्रथम – कादंबरी किरण चवरे (95.83%)

द्वितीय – सौंदर्या गौतम सोगळे (95.67%)

तृतीय – समृद्धी कुणाल पाटील (91.83%)

🔹 विज्ञान शाखा

प्रथम – साहिर माजिद महागमी (94.17%)

द्वितीय – संध्या राजू पवार (93.50%)

तृतीय – वैष्णवी सुनील पाटील (92.50%)

🔹 स्वयंअर्थसहाय्य विभाग

प्रथम – प्रणोती नागनाथ जट्टे (97%)

द्वितीय – शुभांगी नागेश ढाले

तृतीय (संयुक्त) – अक्षरा सचिन बर्डे (95%) व साक्षी सुधाकर रोकडे (95%)

कार्यक्रमात पालक प्रतिनिधी शकील नदाफ व आसिफ वडवान यांनी महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध शिक्षणपद्धतीचे कौतुक केले. विद्यार्थिनी अक्षरा बर्डे हिने मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व बारावीमध्ये अधिक उज्वल यश मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन तुपकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत पाटील यांनी केले.

Post Views: 25
Previous Post

सिंहगड स्कूलच्या विद्यार्थ्यांची साऊथ एशियन गोल शॉट बॉल स्पर्धेसाठी निवड

Next Post

एमआयडीसी-कॉस्मे कराराने कोरियन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला नवे बळ; गुंतवणूक, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञान सहकार्यास चालना

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
एमआयडीसी-कॉस्मे कराराने कोरियन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला नवे बळ; गुंतवणूक, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञान सहकार्यास चालना

एमआयडीसी-कॉस्मे कराराने कोरियन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला नवे बळ; गुंतवणूक, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञान सहकार्यास चालना

ताज्या बातम्या

भोंदू मनोहर भोसलेसह दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

April 26, 2026

सिव्हिल मधील डॉक्टरांनी स्वतःच्या हातावर केला वार.

April 26, 2026

बाळे येथे तेरा वर्षांचा मुलीचा बालविवाह रोखला

April 26, 2026

बागेश्वर बाबा महाराजांबाबत बरळले फडणवीस काय म्हणाले..? #marathinews

April 26, 2026
राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीमध्ये गरुड भरारी घेण्याची क्षमता

राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीमध्ये गरुड भरारी घेण्याची क्षमता

April 26, 2026
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीवर राजीमवाले कुटूंबाची भक्तीमय निष्ठा – डॉ.पुरूषोत्तम राजीमवाले

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीवर राजीमवाले कुटूंबाची भक्तीमय निष्ठा – डॉ.पुरूषोत्तम राजीमवाले

April 26, 2026
अतिक्रमणामुळे झाकाळलेला ऐत्यासिक संस्थानकालीन टेहळणी बुरुज झाला खुला

अतिक्रमणामुळे झाकाळलेला ऐत्यासिक संस्थानकालीन टेहळणी बुरुज झाला खुला

April 26, 2026
मुलींच्या स्वप्नांना आता निवासी शिस्तीची जोड; ‘श्रीराधा गुरुकुल’च्या प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुलींच्या स्वप्नांना आता निवासी शिस्तीची जोड; ‘श्रीराधा गुरुकुल’च्या प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0831093

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697