अक्कलकोट – श्री दत्तगुरुचे अवतार श्री वटवृक्ष स्वामी महाराज अक्कलकोटी २२ वर्ष वास्तव्य केले . त्यांच्या लिला कार्यानी अक्कलकोटची भुमी पावन झाली .स्वामी दर्शनार्थ देश विदेशातुन स्वामीभक्त पर्यटक यात्री अक्कलकोट तीर्थक्षेत्री येतात . धार्मीक पर्यटना बरोबरच अक्कलकोट ला संस्थानिक राजघराण्याचा ऐत्यासिक वारसा लाभला आहे .
राजधराण्याचे ऐत्याIसिक वारसा सांगणाऱ्या ऐत्यासिक वास्तुही तीर्थक्षेत्र अक्कलकोटी अद्यापही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत . त्याच्यापैकीच एक असलेला संस्थानकाली अंत्यत महत्वाचा असलेला टेहळणी बुरुज वटवृक्ष स्वामी मंदिर परिसरातील मोठया प्रमाणातील अतिक्रमणामुळे झाकाळला होता . नगरपालिकेने केलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत संस्थानकालीन ऐत्यासिक टेहळणी बुरुज गेल्या . किमान ३८ वर्षानंतर दिमाखात सर्वानां पहावयास मिळाला आहे .
अक्कलकोट संस्थानकाळी टेहळणी बुरुजाला फार महत्व होते .टेहळणी बुरुजावरून संस्थानचे सैनिक पाहरेकरी रक्षक शत्रुच्या हालचालीवर नजर ठेवीत . संस्थानकाळी अक्कलकोट शहराच्या प्रवेशाकरिता धाकटी वेस ‘ मोठी वेस असे प्रवेशद्वार कमान होत्या .पहारेकरी होते . संरक्षणाकरिता टेहळणी बुरुज होते . या टेहळणी बुरुजापैकी एक बुरुज वटवृक्षस्वामी मंदिर परिसरात आहे .. वटवृक्ष मंदिर परिसरात मोठया प्रमाणातील अतिक्रमणामुळे ऐत्यासिक टेहळणी बुरुज पुर्णपणे झाकळते होते .
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी मोठी अतिक्रमण विरोधी मोहिम राबविली यामुळे ऐत्यासिक टेहळणी बुरुज साऱ्याच्या दृष्ठीस पडत आहे .ऐत्यासिक वारसा सांगणाऱ्या या संस्थानकालीन वास्तु याची निगा ‘ संरक्षण ‘ रंगरंगोटी ‘डागडुजी व्हावी . यावर वाढलेली झाडी अधुनिकरा रासायनिक पावडर द्वारे फवारणी करुन ही झाडे वास्तुला धक्का न लावता झाडे सुकवता येणे शक्य आहे .
ऐत्यासिक संस्थानकालीन टेहळणी बुरुजाचे जतन व्हाव .निगा राखावी रंगरंगोटी व्हावी शहराच्या सौंदयात भर घालावी . पर्यटक यात्री भाविक अधिका अधिक अक्कलकोट तीर्थक्षेत्री यावेत त्यांचां येथे अधिवास वाढावा .जेणेकरुन तीर्थक्षेत्र अक्कलकोट तीर्थक्षेत्र पर्यटन पर्यटक वाढावेत व्यवसाय वृध्दी व्हावी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात असे प्रयत्न होणे गरजेचे आहे .
























