सोलापूर : डॉ. शिवाजी शिंदे यांच्या ” भावगंधित व्यक्तिमत्वे ” या ग्रंथास लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅदमीचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
२०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावर्षीचा तृतीय पुरस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सहायक कुलसचिव म्हणून कार्यरत असणारे डॉ. शिवाजी शिंदे यांच्या ” भावगंधित व्यक्तिमत्वे ” या ग्रंथास जाहीर झाला आहे. शाल, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे .
या पुरस्कार योजनेसाठी प्राप्त झालेल्या ग्रंथांचे मान्यवर परिक्षकांनी परिक्षण केल्यानंतर पुरस्कार समितीच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. दिनांक 28 मार्च 2026 रोजी भालचंद्र ब्लड बँक, बसस्टॅन्ड मागे लातूर येथे एका शानदार सोहळ्यात करण्यात आहे. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. माधव गादेकर, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅदमी लातूर यांच्या अध्यक्षतेखाली तर प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर, ॲड. श्रीधर गायकवाड, कार्याध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅदमी, लातूर आणि प्रकाश घादगिने, सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅदमी, लातूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या पुरस्काराबद्दल डॉ. शिवाजी शिंदे यांचे शैक्षणिक, सामाजिक, प्राशासकीय, साहित्यिक आदी सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


























