अक्कलकोट – भिमप्रकाश मागासवर्गीय बहुउद्देशिय संस्था अक्कलकोट च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक एस टी स्टॅंड येथे महात्मा बसवेश्वर महात्मा जोतिबा फुले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून आलेल्या सर्व भिमसैनिक व नागरिकांना जेवण वाटपाचा कार्यक्रम करून समारोप करण्यात आला. सदरचा कार्यक्रम दि. २१ एप्रिल रोजी घेण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. विजय हर्डीकर , नगरसेवक अविनाश मडिखांबे ज्येष्ठ नेते शिवराज बिराजदार ,युवानेते जोतिर्लिंग स्वामी , माजी सरपंच प्रकाश दुपारगुडे , माजी सरपंच रमेश बनसोडे , शिव बसव डॉ बी आर आंबेडकर मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संदिप मडिखांबे ,पत्रकार स्वामीराव गायकवाड , पत्रकार राजेश जगताप , कामगार नेते सिद्धार्थ बनसोडे , युवा नेते संदिप बाळशंकर ,परशुराम भगळे प्रशांत मडिखांबे ओंकार कांबळे शरणू किणीकर देविदास नडगम नितेश मडिखांबे अजय मडिखांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिलामणी बनसोडे , खजिनदार विजय भालेराव संस्थापक सहसचिव प्रदिप मडिखांबे , उपाध्यक्ष शिवा मडिखांबे , सदस्य पुष्पराज मडिखांबे , उत्सव अध्यक्ष शिवा नाटीकर , उपाध्यक्ष राम सोनकांबळे , खजिनदार रतन इंगळे , सचिव पोपट बनसोडे , गंगाराम वाघमारे , अजय इसामंत्री किशोर शिंदे नागेश गायकवाड जय बनसोडे संदेश साबळे पृथ्वीराज चौधरी रवि मुगळे आदी पदाधिकारी, सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

























