वेळापूर – येथील जि.प. प्राथमिक शाळा, बनकरवस्ती येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा गौरव करताना हा कार्यक्रम भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.
यावेळी मंथन, अभिरूप व प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये मनस्वी नवनाथ माने, कार्तिक धनंजय म्हेत्रे, स्वरा आबा वाघ, श्रीशा सोमनाथ म्हेत्रे, श्रीराम कृष्णा फुले, तनिषा रमेश एकतपुरे, स्वरा सचिन म्हेत्रे, प्रज्वल सचिन म्हेत्रे, प्राची प्रकाश म्हेत्रे, समर्थ नितीन म्हेत्रे, शुभम दीपक म्हेत्रे आणि स्वरा गणेश होमकुंबरे या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमप्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल सातपूते, डॉ. कटके, माधुरी एकतपुरे मॅडम, मगर सर, माने मॅडम तसेच धनंजय म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असा प्रेरणादायी संदेश मान्यवरांनी विद्यार्थ्यांना दिला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. धनंजय म्हेत्रे यांच्या वतीने उपस्थित सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमास ज्ञानेश्वर म्हेत्रे, भिमराव म्हेत्रे, निलेश म्हेत्रे, अक्षय पिसे, गोरख ढगे, नाना एकतपुरे, ज्ञानेश्वर बनकर, रेश्मा होमकुंबरे तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा प्रियंका कस्तुरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती सूर्यवंशी मॅडम आणि गाढवे मॅडम यांनी


























