सांगोला – श्री श्री श्री १०८ गुरुमुर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामी ३० वे पिठाधिपती यांचे आशीर्वादाने जवळे (ता.सांगोला) येथे नूतन मठ वास्तु प्रवेश व गुरुगादी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक गुरुमुर्ती लिंगायत मठ संस्थान व वीरशैव लिंगायत समाज, जवळे यांनी दिली.
मंगळवार दि.२८ एप्रिल रोजी दु.४ वा. सुहासिनी कुंभ व गुरुपादुका ग्रामप्रदक्षिणा, बुधवार दि.२९ एप्रिल रोजी स.६ वा. वास्तुपूजन, गणेश याग, रुद्र याग, होम हवन पूजा, महा मंगल आरती व स.११ वा. कोळेकर महास्वामीजी ३१ वे पिठाधिपती यांच्या अमृत हस्ते धर्मसभा, आशीर्वचन, महाआरती व महाप्रसाद वाटप होईल.
तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


























