अकलूज – समाजसेवेचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून अकलूज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे परिसरातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे रक्तदान शिबिर मंगळवार, दिनांक ५ मे २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.०० या वेळेत ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, शंकरनगर-अकलूज येथे पार पडणार आहे. या शिबिरात रक्तदानाबरोबरच विविध आरोग्य तपासण्या देखील मोफत व अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, ईसीजी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच अल्प दरात सोनोग्राफी, एक्स-रे, पंचकर्म उपचार आणि चष्म्यांची सोयही करण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
विशेष म्हणजे रक्तदात्यांना संस्थेमार्फत आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये स्मार्ट वॉच, हेल्मेट, वॉटर कॅन, ट्रिमर/ग्रूमिंग किट तसेच इयरबड्स अशा उपयुक्त भेटींचा समावेश आहे.
आयोजकांकडून सर्व नागरिकांना या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संदेशातून समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे.अधिक माहितीसाठी 9960464453 / 9503067480 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.


























