पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव ओम सचिन गाटे याने फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेत 91.67 टक्के गुण संपादन करीत दैदीप्यमान यश संपादन केले .तो सध्या पुणे येथील फगर्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत आहे .पिलीव सारख्या ग्रामीण भागातून जाऊन पुणे सारख्या शहरात त्याने हे उत्तुंग यश संपादन केले .ओम हा माळशिरस तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक सचिन गाटे सर यांचा मुलगा आहे .
ओमच्या ह्या यशाबद्दल माळशिरस पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी मॅडम, तसेच पिलीव येथील माजी विद्यार्थी संघटना आठवणी 95 ,तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे. फोटो _ ओम गाटे


























