बार्शी – तालुक्यातील मालवंडी येथे श्री शेखागौरी यात्रेनिमित्त शिवम इलेक्ट्रिकल्सच्यावतीने गेल्या सहा वर्षांपासून सुरु असलेला सामाजिक उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. यात्रेसाठी येणाऱ्या भक्त-भाविकांना उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी तब्बल १ हजार लिटर मोफत लिंबू सरबत वाटप करण्यात आले.
उन्हाची तीव्रता लक्षात घेता हा उपक्रम भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला. यात्रेला आलेल्या नागरिकांनी या सेवाभावी कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी शिवम इलेक्ट्रिकल्सचे शरद माळी, सुमित माळी, बालाजी माळी, आधिरा मोबाईल शॉपीचे किरण खुरंगळे, ओंकार लोखंडे, विठ्ठल खंडागळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून देण्यात आले असून, परिसरात या कार्याचे कौतुक होत आहे.

























