सांगोला – आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ ड-१ अंतर्गत लायन्स क्लब ऑफ, सांगोला क्लबचे अध्यक्ष प्रा.नवनाथ बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेत २०२६-२७ करिता अध्यक्षपदी प्रशांत रायचुरे, सचिवपदी प्रा.प्रसाद खडतरे तर खजिनदारपदी प्रा.निलेश नागणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी सदस्य विलास क्षिरसागर, सचिव सूर्यकांत कांबळे, खजिनदार मंगेश म्हमाणे, उन्मेष आटपाडीकर, प्राचार्य अमोल गायकवाड, प्रा.शिवशंकर तटाळे, सुनील भोरे, प्रा.डी.के.पाटील, प्रा.तानसिंग माळी, प्रा.धनाजी चव्हाण, सचिन पाटणे, दत्तात्रय देशमुख उपस्थित होते.
यावेळी प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी २०२५-२६ सालातील विविध उपक्रमांचे कौतुक करून येणाऱ्या वर्षात देखील अश्याच पद्धतीने समाजोपयोगी कामे करण्याचे आवाहन केले. प्रा.नवनाथ बंडगर यांनी आभार मानले.

























