Wednesday, May 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अब्दुलकादर शेख यांना निष्ठावान गुणी रयत सेवक पुरस्कार

तरुण भारतbyतरुण भारत
May 6, 2026
in editor
0
अब्दुलकादर शेख यांना निष्ठावान गुणी रयत सेवक पुरस्कार
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, नवोपक्रम आणि समाजाभिमुख कार्याचा आदर्श निर्माण करणारे न्यू इंग्लिश स्कूल, कुसूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील सहशिक्षक श्री. अब्दुलकादर ईसाक शेख यांना “ माजी प्राचार्य एन.आर.माने, निष्ठावान गुणी रयत सेवक पुरस्कार – २०२६” जाहीर झाला आहे.

 

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दि. ८ मे २०२६ रोजी सातारा येथे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. गेल्या १३ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. शेख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण आणि परिणामकारक प्रयत्न केले आहेत. गणित व विज्ञान विषयात त्यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून एस.एस.सी. परीक्षेत सातत्याने १०० टक्के निकाल मिळवून दिला आहे. त्यांच्या अध्यापन पद्धतीत कृतीशीलता, संकल्पनांची सुस्पष्टता आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन यांचा प्रभावी संगम दिसून येतो.

 

नवोपक्रमी अध्यापनाची ओळख

श्री. शेख यांनी पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक परिणामकारक केले आहे. त्यांनी ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नसंच, डिजिटल चाचण्या, कृतीयुक्त अध्यापन साहित्य यांची निर्मिती करून विद्यार्थ्यांच्या शिकण्याची गुणवत्ता उंचावली. कोविड-१९ काळात ‘रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन (ROSE)’ या प्रकल्पातून त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत अखंड शिक्षण पोहोचवले.

 

विद्यार्थ्यांच्या यशामागील प्रेरक शक्ती

त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एनएमएमएस शिष्यवृत्ती, इन्स्पायर अवार्ड, विज्ञान प्रदर्शन, बिल्डेथोन, यांसारख्या स्पर्धांमध्ये जिल्हा व राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नवोपक्रम, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी त्यांनी “कोण होईल सहस्रपती” या प्रश्नमंजुषा उपक्रम नवरात्र उस्तव प्रसंगी सलग ४ वर्षे राबवली, ज्याला विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी

श्री. शेख यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान, मतदान जनजागृती, ‘बेटी बचाओ’, ‘विद्यार्थी बँक’, वाचन संस्कार, जेष्ठ नागरिक आजी आजोबाशी पालक संवाद इत्यादी उपक्रम आणि यांसारख्या विविध कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्य वितरण, दानपेटी उपक्रम यांद्वारे त्यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे.

 

 

लेखनातून बौद्धिक योगदान

विज्ञान विषयावरील त्यांचे लेखन विविध नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून त्यांनी एकूण १४ पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. “शिक्षण संक्रमण” मासिकात प्रकाशित झालेला त्यांचा विद्यार्थी बँक हा लेखही विशेष चर्चेत आला होता. त्यांच्या लेखनातून विज्ञानाची आवड आणि विचारप्रवर्तक दृष्टी स्पष्ट होते.

 

सन्मानांची मालिका

त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श गुरुवर्य पुरस्कार, आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार, शिक्षकरत्न पुरस्कार, स्वयंम क्रांती सन्मान यांसारखे अनेक मानाचे पुरस्कार देऊन गौरविले आहे.

 

शिक्षणातून घडवलेले मूल्याधिष्ठित समाजभान

श्री. शेख यांच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि जीवन कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेत शिक्षणाची गुणवत्ता वाढली असून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वृद्धिंगत झाला आहे.

 

•           १३ वर्षांचा समृद्ध अध्यापन अनुभव

•           एसएससीमध्ये सातत्याने १००% निकाल

•           डिजिटल शिक्षण व ऑनलाइन चाचण्यांची निर्मिती

•           विद्यार्थ्यांसाठी YouTube शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती

•           शाळा आणि विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक माहितीच्या ब्लॉगस्पॉटची निर्मिती

•           एनएमएमएस व इन्स्पायर अवार्ड मध्ये विद्यार्थ्यांचे यश

•           १४+ विज्ञान लेख प्रकाशित

•           सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग

त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचा परामर्श घेऊन रयत शिक्षण संस्थेने त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे

 

त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. चंद्रकला भोरे,  मुख्याध्यापक मारुती मडवळी, संजय जोशी, ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय पवार, देवानंद महामुनी, सचिन पाटील, संतोष पाटील, संभाजी दीक्षित, वसंत ताकमोगे, रशीद शेख, माजी  संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री सुरेश ढेरे, विभागीय अधिकारी मा.श्री.जगदाळे साहेब, विभागीय सहायक अधिकारी दिनेश दाभाडे, निकम साहेब, लाईफ मेंबर श्रीकृष्ण रेडे, राजेंद्र केदार, विद्यालयाचे मार्गदर्शक बाळप्पा नांगरे मामा, स्थानिक स्कूल समितीचे सदस्य सुनीलकुमार नांगरे, अशोक बिराजदार, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धाराम विंचुरे, माता पालक संघ, माजी विद्यार्थी संघ यांच्यासह पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी आणि पालकांनी अभिनंदन केले.

 

Post Views: 23
Previous Post

दवाखान्यात पत्नीचा डबा घेवून निघालेल्या पतीला ट्रकची धडक; जागीच मृत्यू

Next Post

बोरामणी नाका परिसरात पुन्हा एक अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बोरामणी नाका परिसरात पुन्हा एक अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

बोरामणी नाका परिसरात पुन्हा एक अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

ताज्या बातम्या

सीना माढा उपसा सिंचन योजना व्यवस्थितपणे चालवली असती तर… दुष्काळ पडेल असा अंदाज

May 6, 2026
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

May 6, 2026

टीजेएसबी (TJSB) सहकारी बँकेत भवानी सहकारी बँक विलीन

May 6, 2026
कचरा डेपोतील आग आटोक्यात, कुलिंग ऑपरेशन सुरू 

कचरा डेपोतील आग आटोक्यात, कुलिंग ऑपरेशन सुरू 

May 6, 2026
सोलापूर वीज कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन, आजपासून देखभाल ठप्प

सोलापूर वीज कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन, आजपासून देखभाल ठप्प

May 6, 2026
बोरामणी नाका परिसरात पुन्हा एक अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

बोरामणी नाका परिसरात पुन्हा एक अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

May 6, 2026
अब्दुलकादर शेख यांना निष्ठावान गुणी रयत सेवक पुरस्कार

अब्दुलकादर शेख यांना निष्ठावान गुणी रयत सेवक पुरस्कार

May 6, 2026
दवाखान्यात पत्नीचा डबा घेवून निघालेल्या पतीला ट्रकची धडक; जागीच मृत्यू

दवाखान्यात पत्नीचा डबा घेवून निघालेल्या पतीला ट्रकची धडक; जागीच मृत्यू

May 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0848915

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697