पंढरपूर – स्थानिक शैक्षणिक क्षेत्रात भक्कम परंपरा आणि गुणवत्तेचा ठसाउमटवणाऱ्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शैक्षणिक शाखांमध्ये यावर्षीप्रवेशासाठी पालकांचा उदंड व उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेवर पालकांचा दृढ विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सर्वआधुनिक सोयी-सुविधा, तंत्रयुक्त व सांगणिकीय शिक्षण, तसेच पूर्णपणे डिजिटल शैक्षणिक प्रशासन यामुळे शिक्षण प्रक्रियेला नवे परिमाण प्राप्त झाले आहे.
विद्यार्थी केंद्रित(विद्यार्थीभिमूख) शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुणांचा विकास होत आहे. उन्हाळी सुट्टीत इयत्ता १० वी आणि ५ वीच्या विदयार्थ्यांना विशेष मार्गदर्शन होत आहे. त्यामुळे दरवर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रत्येक शाखेतून ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या किमान ५० हून अधिक विद्यार्थ्यांची परंपरा ही संस्थेच्या गुणवत्तेची साक्ष देते.
याशिवाय, शाळाबाह्य विविध परीक्षांमध्येही जसे की एन.एन.एम.एस. टि.म.वि.,विज्ञान, स्कॉलरशिप, गणित व इतरस्पर्धात्मक परीक्षेत या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने उल्लेखनीय यशसंपादन करून संस्थेचे नाव उंचावले आहे. संस्थेचे समृद्ध ग्रंथालय, शिस्तबद्ध वातावरण आणि भक्कम मूलभूत सुविधा या सर्व घटकांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध झाले आहे.
संस्थेच्या यशामागे चेअरमन श्रीमती वीणाताई जोशी, अध्यक्ष नानामालक कवठेकर, मानद सचिव सु.र.पटवर्धन, तसेच सु.त्रि.अभ्यंकरआणि इतर सदस्यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन लाभत आहे. याबरोबरच कवठेकरप्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.वाय.पाटील व द.ह.कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी,आदर्श बाल वप्राथमिकच्या माया सांगोलकर तसेच पंचरत्न इंग्लिश मिडीयम स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ.मोहोळकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्व शैक्षणिक शाखांची यशाची चढती कमान अधिकाधिक उंचावत आहे.
या सर्व घटकांचा एकत्रित
परिणामम्हणून, यावर्षीसंस्थेच्या सर्व शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांचा प्रचंड उत्साह आणि दृढविश्वास दिसून येत असून, पंढरपूर एज्युकेशन सोसायटी ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची एक विश्वासार्ह परंपरा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



























