अक्कलकोट – शहर व तालुक्यातील अनेक सामाजिक उपक्रमात संतोष पराणे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या अंगी असलेल्या सेवाभाव तत्वामुळे अनेक संत महात्म्यांशी त्यांचे ऋणानुबंध जुळले आहेत. त्यांचा सेवाभाव व नम्र स्वभाव पाहून अनेक नागरीकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहेत. या माध्यमातून संतोष पराणे यांनी ही अखंड सेवेचा ध्यास आत्मसात केलं आहे म्हणून अखंड सेवेचा ध्यास घेतल्याने संतोष पराणे सेवा सन्मान पुरस्काराचे खरे मानकरी असल्याचे मनोगत येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक व स्विमींग ग्रुपचे संस्थापक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. नुकतेच
कर्नाटक येथील शिवलिंगेश्वर विरक्त मठ मादन हिप्परगा यांच्या वतीने संतोष पराणे यांना चालू सालातील सेवा सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
मठाधीश म.नि.प्र.श्री.अभिनव शिवलिंग स्वामीजी व अक्कलकोट विरक्त मठाचे श्री.म.नि.प्र.बसवलिंग स्वामीजी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून संतोष पराणे यांचा सन्मान करण्यात आला. या सेवा सन्मान पुरस्कारा प्रित्यर्थ स्विमींग ग्रुपच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून नगरसेवक महेश इंगळे यांनी संतोष पराणे यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी महेश इंगळे बोलत होते.
यावेळी स्विमिंग ग्रुपचे प्रथमेश इंगळे, ओंकार उटगे, खाजप्पा झंपले, संतोष जवळगे, अंकुश केत, चंद्रकांत सोनटक्के, रमेश शिंदे, विद्याधर गुरव, प्रथमेश इंगळे, मल्लिनाथ माळी, अशोक कलशेट्टी सर, कुमार हत्तुरे, रमेश कणमुसे, सचिन किरनळ्ळी, शशिकांत पराणे, हनुमंत माळी, अरविंद पाटील, बाबा सुरवसे, सिद्धाराम बिडवे, शैलेश राठोर, सुनील पवार, अमर पाटील, मनोज जगताप, सुरेश पाटील, प्रसन्न हत्ते, प्रसाद पाटील, विश्वनाथ देवरमनी, अमर पाटील, शैलेश राठौर, शिवशरण अचलेर, रफिक पठाण, दत्ता कटारे, समर्थ पराणे, हर्षल माळी, तन्मय इचगे, श्रीकांत झिपरे, रमेश शिंदे सर इत्यादी उपस्थित होते.

























