सांगोला – विठ्ठलवाडी, महूद (ता.सांगोला) येथील पोलिस खात्यात कार्यरत असणारे विकास नानासो मेटकरी यांनी खाते अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. याबद्दल महूद ग्रामस्थ आणि हनुमान कट्टा अभ्यासिका मित्र मंडळाच्या वतीने नागरिक सत्कार करण्यात आला.
यावेळी जि.प.सदस्य दादासाहेब लवटे, उमेश पाटील, बापू कदम, जीवन खांडेकर, विलास पाटील, सूर्यकांत घाडगे, विजय खबाले, अभिजीत कांबळे, शंकर पाटील, संतोष खडतरे, संतोष पवार, धनाजी कांबळे, नितीन वडे, विकास पाटील उपस्थित होते. यावेळी मित्र परिवाराच्यावतीने विकास मेटकरी यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी वैभव बाजारे, प्रभाकर कांबळे, नवनाथ पवार, शहाजी दिघे, गणेश कांबळे, सोमनाथ दुर्वे, राजू जाधव, शशिकांत मेटकरी, इरफान मुलाणी, गणेश बिडवे, विजय पवार, प्रमेय वडे उपस्थित होते.


























