सोलापूर : महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी महाराष्ट्र राज्य प्राध्यापक विकास अकादमी (MSFDA) यांच्या पुढाकारातून एक आठवड्याचा पुढाकारातून आयोजित “प्राध्यापक विकास कार्यक्रम” (FDP) सध्या सोलापूरातील एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात सुरू असून राज्यभरातील प्राध्यापकांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
“क्षमता उजागर करणे : रसायनशास्त्र शिक्षणतज्ज्ञांना सशक्त बनविणे” या विषयावर आधारित हा उपक्रम दि. ४ ते ८ मे २०२६ दरम्यान एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव येथे होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री प्रो. गणपती यादव यांच्या हस्ते झाले. यावेळेस डॉ. प्रकाश महानवार (कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) डॉ. ए. ए. घनवट (संचालक, रासायनिक विज्ञान शाळा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर), सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शंकर नवले, सिंहगड सीआरटीडीचे संशोधन संचालक डॉ. एस एच पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी ग्रीन एनर्जीबाबत मार्गदर्शन करताना वाढत्या कार्बन उत्सर्जनावर चिंता व्यक्त केली. “ऊर्जेच्या वाढत्या गरजा लक्षात घेता हायड्रोजन हा भविष्यातील महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोत तात्काळ बंद करणे शक्य नसले तरी पर्यावरणपूरक पर्याय शोधणे आणि त्यांचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
प्लास्टिकच्या वापराबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आजच्या जीवनशैलीत प्लास्टिक पूर्णपणे टाळणे शक्य नाही; मात्र त्याचा पुनर्वापर (reuse) आणि पुनर्निर्मिती यावर भर दिला पाहिजे. कार्बन उत्सर्जन कमी करून ग्रीन एनर्जीचा स्वीकार केल्याशिवाय पर्यावरणाचे संतुलन राखता येणार नाही.”
“अशा दर्जेदार शैक्षणिक उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि अंमलबजावणी करून प्राध्यापकांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमामुळे संशोधन व अध्यापनात नवे दालन उघडेल,” असे पद्मश्री यादव यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे समन्वयक सिंहगड महाविद्यालयाचे डॉ. किरण पाटील यांनी केले.
यात डॉ. दिनेश आमलेरकर, डॉ. संजय चराटी, डॉ. प्रकाश वाडगांवकर, डॉ. एस. एच. पवार, डॉ. जी. एस. ग्रोव्हर, डॉ. सुनिता बर्वे यांच्यासह सीएसआयआर–राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR-NCL), पुणे येथील अनेक वरिष्ठ वैज्ञानिकांचा समावेश आहे. तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध विद्यापीठांतील प्राध्यापकही मार्गदर्शन मिळत आहे.
कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “पीएम-उषा (PM-USHA) अंतर्गत आतापर्यंत अनेक शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा प्राध्यापक विकास कार्यक्रम (FDP) अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. सिंहगड संस्थेने ही जबाबदारी स्वीकारून उत्कृष्ट नियोजन केले आहे, याचे विशेष कौतुक करावे लागेल.”
ते पुढे म्हणाले, “हा उपक्रम आपल्या विद्यापीठाच्या अंतर्गत आणि विशेषतः सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित होत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. अशा दर्जेदार कार्यक्रमांमुळे प्राध्यापकांच्या ज्ञानात व संशोधन क्षमतेत नक्कीच भर पडेल.”
यांसह देशातील नामांकित शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत. तसेच सीएसआयआर–राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (CSIR-NCL), पुणे येथील वरिष्ठ वैज्ञानिकांची उपस्थितीही या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरत आहे.
पॉलिमर सायन्स, केमिकल इंजिनिअरिंग, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, तंत्रज्ञान नवकल्पना आणि अध्यापनातील आधुनिक ICT साधनांचा वापर या विषयांवर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे प्राध्यापकांना संशोधनातील नव्या दिशा आणि उद्योग-शिक्षण समन्वयाबाबत सखोल माहिती मिळत आहे.
हा कार्यक्रम सध्या सुरू असून पुढील काही दिवसांत विविध तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे पार पडणार आहेत. या माध्यमातून सोलापूरच्या शैक्षणिक वातावरणाला नवी चालना मिळत असून राज्यभरातील प्राध्यापकांना दर्जेदार प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे.


























