पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयासमोर अन अधिकृत होर्डिंग्ज यामुळे अक्षरश शाळाच दिसत नव्हती तसेच यामुळे खरेतर विद्यालयासमोरील विद्यार्थ्यांनी लावलेल्या सायकलच्या चोऱ्या होत होत्या.
यामुळे शाळेसमोरील अन अधिकृत होर्डिंग्ज ताबडतोब हटविण्यात यावे असे वृत्त दैनीक तरुण भारतने 4 मे रोजी प्रसिद्ध केले होते .याच दणक्याने शाळेसमोरील सर्व अन अधिकृत होर्डिंग्ज हटविण्यात आली आहेत .
यामुळे शाळेने अक्षरश मोकळा श्वास घेतला असुन आता बसस्थानकावरुन याठिकाणी विद्यालयाची इमारत दिसत आहे . फोटो _ कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयासमोरील अन अधिकृत होर्डिंग्ज हटविलयानंतर.

























