वेळापूर – येथील लोकविकास शिक्षण प्रसारक संस्था संचलित लोकविकास मराठी मिडीयम स्कूल या शाळेची इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी स्नेहा हनुमंत साठे हिची नवोदय विद्यालय, पोखरापूर येथे इयत्ता अकरावीसाठी निवड झाली. त्यामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक जालिंदर बनकर, सचिव चंद्रकांत नवले, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक सुनिल पताळे, मुख्याध्यापक अमोल पांढरे, मुख्याध्यापक अजित बनकर यांनी स्नेहा साठे हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
लोकविकास मराठी माध्यमच्या या यशामुळे वेळापूर परिसरातून विद्यार्थी, पालक आणि संस्थेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






















