अक्कलकोट – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक करून त्यांना सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया सोलापूर जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य स्वामीराव गायकवाड, सोलापूर जिल्हा डिजिटल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश जगताप, ज्येष्ठ सदस्य समाधान आहिरे, रमेश भंडारी आदी उपस्थित होते.

























