सोलापूर – माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे एक महिला शिक्षक न्याय मागण्यासाठी गेले असता त्याच्यावर केस करून अडकाविता हा कोणता न्याय आहे. त्यामुळे याप्रकरणी शहानिशा करून चौकशी करावी अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा आदिवासी समाजाच्या नेत्यांनी दिला आहे.
मागील दोन दिवसा जल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शितल काळे या महिला शिक्षिकेविरूध्द तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी सिव्हिल हॉस्पिटलमधून उपचार घेत थेट काळे या महिला शिक्षिकेसह त्यांचे पती, दोन मुले यासह आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळानी बुधवारी सीईओ कुशल जैन यांची भेट घेतली. त्यावेळी सीईओ यांनी काळे या महिला शिक्षिकेचे दहा वर्षाचे फरक आहे ते देण्याचे आश्वासन दिले असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
याशिवाय शिक्षणाधिकारी यांनी तुमच्याविरूध्द तक्रार केली असेल आणि तुमची काही तक्रार असेल तर ते तुम्ही देवू शकता. आमचा विभाग प्रमुख जर दोषी असेल तर मी कारवाई करणारच असल्याचे आश्वासन सीईओ यांनी दिले असल्याची माहिती आदिवासी शिष्टमंडळाला दिली.
यावेळी शिक्षिका शितल काळे यांच्यासह माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, नकूल चव्हाण, चिट्ट पवार आदी उपस्थित होते.


























