सांगोला – आलेगाव (ता.सांगोला) येथील प्रा.डॉ.रामचंद्र यादव यांना के.एस.आय.पब्लिकेशन, महाराष्ट्र राज्य आयोजित २९ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा लोकनेते यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोल्हापूर येथील करवीर नगर वाचन मंदिरात रविवार दि.१७ मे रोजी संपन्न होणाऱ्या संमेलन सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. प्रा.डॉ.यादव यांनी ज्ञानेश्वरीच्या मराठी अनुवादांचा अभ्यास या विषयावर संशोधन करून १०७२ पृष्ठांचा बृहद स्वरूपाचा प्रबंध लिहिला आहे. त्यांचा आराधना हा काव्यसंग्रह यापूर्वीच प्रसिद्ध झालेला असून साहित्य संमेलनात सर्वसाक्षी या दुसऱ्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित केलेला आहे.
सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रा.डॉ.यादव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
























