पंढरपूर – ज्येष्ठ पत्रकार व ‘झी चोवीस तास’ तसेच ‘न्यूज १८ लोकमत’ चे माजी मुख्यसंपादक उदय निरगुडकर यानी दिनांक १० मे २०२६ रोजी पंढरपूर येथील प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट येथील विद्यार्थ्यांना अभ्यास, यश आणि करिअर विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाराष्ट्र नॉलेज सेंटर सोलापूरचे रविराज पवार तसेच महाराष्ट्र नॉलेज सेंटर पुणेचे सचिन शिंदे यांची देखील उपस्थिती लाभली.
या प्रसंगी उदय निरगुडकर यांच्या हस्ते विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या मध्ये इयत्तादहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणारे पंढरपूरचे तीन विद्यार्थी चि.रुद्र अभय उत्पात, चि.मिहिर मकरंद बडवे व चि. अथर्व अमितवाडेकर तसेच प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूटचे इयत्ताबारावीमध्ये पंढरपूर केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवणारे चि. अक्षय सिद्धेश्वर घाडगे, जेईई मेन्स २०२६ परीक्षेत ९९.३०% गुण मिळवून पंढरपूरात प्रथम क्रमांक मिळवणारी कु. वैभवी पांडुरंग कोळी व जेईई मेन्स २०२६ परीक्षेत ९७.३१% गुण मिळवून क्लासमध्ये द्वितीयक्रमांक मिळवणारे चि. ईशान गणेश बाळेकर व अन्य गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
व्याख्याना दरम्यान उदय निरगुडकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, सातत्य, आत्मविश्वासआणि यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेला “गुरुमंत्र” दिला. त्याग वस्वयंशिस्त यांच्यामुळे आयुष्यात मोठे यश मिळते हे त्यांनी सानिया नेहवाल, सचिन तेंडुलकरअशा मान्यवरांच्या उदाहरणातून अतिशय सोप्या शब्दांत उपस्थित विद्यार्थ्यांनासांगितले व आपल्या आयुष्यातील प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांच्या अनुभवपूर्ण, प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थी भारावून गेले. या मार्गदर्शनाचा मोठा लाभ झाल्याची भावना क्लासमधील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी व्यक्त केली.
—————-
या प्रसंगी उदय निरगुडकर यांनी प्रा. परिचारक सरांच्या बद्दल बोलतांना ” एका शिक्षकाने शिक्षणाचा उद्योग न होऊ देता शिक्षण हे त्याच्याआदर्शासकट कस चालवाव याचा आदर्श आपण पंढरपूर येथे निर्माण केला आहे.” असे गौरवोद्गार काढले व प्रा.परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूटचे कौतुककेले.


























