सोलापूर : नवी पेठ येथील महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त मनीषा मगर व मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मनपा झोन तीनचे अधिकारी हानिफ बक्षी, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे मुख्य लिपिक माहेजनबी शेख, पर्यवेक्षक मनीष बांगर, लेखापाल मल्लिकार्जुन हिरेमठ, आम्रपाल वाघमारे, राजेश दासरी, संतोष कळमणकर, सारंगा अंजीखाने, अबरार डोंगरी, गुरुप्रसाद तलवार, तरंगिणी कोंडा, अश्विनी लामपुरे, सायली ढोले, भालचंद्र साखरे आदी उपस्थित होते.

























